स्विमिंग पूलच्या शेजारी मोनोकोनीमध्ये धोनीच्या लेकीने दिल्या आकर्षक पोज


भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनी आज भलेही आपल्याला क्रिकेट खेळताना दिसत नसला तरी त्याची लोकप्रियता आजही अमाप आहे. आजही लोकांना त्याच्याबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुकता असते. धोनीला अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी पॅपराजी स्पॉट करताना दिसतात. काहीच दिवसांपूर्वी धोनी आणि फॅमिलीला मुंबई विमातळावर पाहण्यात आले होते. धोनीसोबतच सर्वांचे लक्ष वेधून घेणारी दुसरी व्यक्ती म्हणजे त्याची लेक जिवा. जिवा नेहमीच तिच्या व्हिडिओंमुळे, फोटोंमुळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असते. सध्या देखील जिवा तिच्या काही क्युट फोटोंमुळे प्रकाशझोतात आली आहे.

सध्या महेंद्रसिंग धोनी, साक्षी धोनी आणि त्यांची मुलगी जिवा दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दुबईवरूनच जिवाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जिवाचा स्विमिंग पूलजवळ उभा असलेला फोटो शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये जिवा नारंगी आणि पांढऱ्या रंगाच्या मोनोकोनीमध्ये खूपच क्युट आणि आकर्षक दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे, “हॉलिडे.”

महेंद्रसिंग धोनी, साक्षी धोनी आणि जिवा हे तिघे नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. त्यांचे विविध ठिकाणांचे अनेक फोटो व्हायरल देखील होतात. सध्या धोनी क्रिकेटपासून लांब कुटुंबासोबत त्याचा वेळ घालवत आहे. जिवाबद्दल सांगायचे झाल्यास जिवाचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाऊंट असून तिला २ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट धोनी किंवा साक्षी धोनी सांभाळतात.

काही महिन्यांपूर्वी जिवा आपल्याला तिच्या वडिलांसोबत पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर एका जाहिरातीमध्ये दिसली. एका बिस्किटाच्या जाहिरातीसाठी ही बापलेकीची जोडी एकत्र आली होती. ही जाहिरात आणि या जाहिरातीतील जिवा सगळ्यांना खूपच आवडली होती. धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता फक्त आयपीएल सामने खेळताना दिसतो. याशिवाय तो बऱ्याच जाहिरातींमधून देखील त्याच्या फॅन्सला दर्शन देत असतो. धोनी आता जरी क्रिकेट खेळत नसला तरी त्याची क्रेझ किंचितही कमी झाल्याचे दिसत नाही.

हेही वाचा-

सलमान खानने शेअर केलेल्या शर्टलेस फोटोवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केलेली कमेंट झाली व्हायरल

बर्थडे गर्ल करिश्मा शर्माचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

‘भाबीजी घर पर हैं’ मधील ‘या’ अभिनेत्याने केले बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम, ‘या’ मालिकेने बदलवले आयुष्य

 


Latest Post

error: Content is protected !!