Friday, October 18, 2024
Home अन्य सिद्धार्थ शुक्लानंतर ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्याचा मृत्यू, नुकताच इजिप्तमध्ये गेला होता ट्रीपला

सिद्धार्थ शुक्लानंतर ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्याचा मृत्यू, नुकताच इजिप्तमध्ये गेला होता ट्रीपला

‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यूनंतर मनोरंजन जगातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘एमटीव्ही लव स्कूल’ फेम जगनूर अनेजा याचा गुरुवारी (२३ सप्टेंबर) हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, जगनूर मिस्त्रमध्ये फिरायला गेला होता. त्याने बुधवारीच त्याच्या या ट्रिपचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला होता. यासोबत त्याने अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडिओ आणि फोटोमध्ये तो एकदम फिट दिसत होता. त्याने फोटो शेअर करून लिहिले होते की, “एक स्वप्न जे आज खरे झाले. जेव्हा मी गिजाचे पिरामिड यांचा प्रवास केला. बकेट लिस्टप्रमाणे एक इच्छा पूर्ण झाली.” परंतु हे कोणाला माहित होते की, ही त्याच्या आयुष्यातील शेवटची इच्छापूर्ती असणार आहे.
(MTV love school fame jahnur aneja passes away dies of heart attack)

अचानक झालेल्या त्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना तसेच अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. कालपर्यंत आपल्यात असणारा व्यक्ती आज अचानक आपल्यातून निघून गेला या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. त्याचे अनेक चाहते आणि कलाकार सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहे. तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या अनेक आठवणी शेअर करत आहेत.

जगनूरने ‘एमटीव्ही लव्ह स्कूल’च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. त्याने या शोमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड मिनिका हिच्यासोबत बिघडलेले नाते नीट करण्यासाठी भाग घेतला होता. परंतु शोमध्ये दोघांचे नाते जुळले नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला. एवढंच नाही, तर या शोमधील इतर स्पर्धकांनी तो गे आहे असे देखील सांगितले होते.

याच महिन्यात प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थचा वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन

-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा

-असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा