Monday, April 15, 2024

Anant-Radhika pre wedding: अंबानी कुटुंबीयांनी ५१ हजार नागरिकांना स्वत:च्या हाताने वाढलं जेवण; प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट(Anant-Radhika pre wedding )यांच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्या लग्नााकडे वेधलं आहे. अशातच प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. या सेरेमनीची सुरुवात अन्नसेवेपासून करण्यात आली. अंबानी कुटुंबीयांनी ५१ हजार नागरिकांना स्वत:च्या हाताने जेवण वाढलं. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विवाह सोहळ्यापूर्वी मुकेश अंबानी, त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि होणारी सून राधिका मर्चंट यांनी रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात अन्नसेवा केली. संपूर्ण अंबानी कुटुंबाने स्वतःच्या हाताने लोकांना जेवण वाढले. या अन्नसेवामध्ये मोठ्यांसख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती.

जवळपास ५१ हजार स्थानिक नागरिकांनी पारंपारिक गुजराती जेवणाचा स्वाद घेतला. यावेळी मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटने नागरिकांशी गप्पा देखील मारल्या. ऐवढच नाही तर राधिकाची आजी आणि आई-वडिलांनी देखील जेवण वाढले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यापूर्वी स्थानिक नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी कुटुंबाने अन्नसेवा आयोजित केली आहे. भोजनानंतर उपस्थितांनी पारंपरिक लोकसंगीताचा आस्वाद घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सुप्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमात चार चाँद लावले. अंबानी कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या अन्नसेवा कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा:

Anant – Radhika Pre Wedding: अनंत – राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी खास थीम; पाहुण्यांना खास ड्रेस कोड घालावा लागेल

Deepika Padukone : बॉलिवूड मस्तानीने दिली गुड न्यूज, सप्टेंबरमध्ये देणार बाळाला जन्म

हे देखील वाचा