Saturday, June 29, 2024

डॉनच्या डायलॉगवर अभिनय करताना दिसले मुकेश अंबानी, पत्नी नीतासोबतचा व्हिडिओ व्हायरल

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रम संपन्न झाला. जामनगर, गुजरातमध्ये 1 मार्च 2024 पासून प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले आणि 3 मार्च रोजी संपले. या तीन दिवसीय कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंतच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये खूप ग्लॅमर जोडले. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी ‘डॉन’च्या डायलॉगवर दमदार परफॉर्मन्स दिला.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही शानदार अभिनय करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते सलीम आणि जावेदने तयार केलेल्या डॉनच्या भूमिकेत दिसत आहे. व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी खुर्चीवर बसून बुद्धिबळाच्या बोर्डाकडे बघताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

ते ब्लॅक सूटसोबत मॅचिंग शेड्समध्ये दिसत आहे. यादरम्यान शाहरुखच्या ‘डॉन’ चित्रपटातील एक डायलॉग ऐकू येतो, ‘डॉनला पकडणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे.’ तेव्हा नीता अंबानी तिथे येतात आणि म्हणतात, ‘पण हा डॉन पकडला गेला आहे. मुकेश, चल, आम्हाला उशीर होतोय, अनंतचे संगीत आले आहे. यानंतर डॉन मुकेश अंबानी हार स्वीकारतात आणि चष्मा काढून ‘येस बॉस’ म्हणतात.

यानंतर डॉनच्या बॅकग्राउंड स्कोअरवर मुकेश अंबानींचा आवाज सुरू होतो. ते म्हणतात ‘आमच्या आयुष्यातील खरा डॉन एकच होता, एकच आहे आणि एकच राहणार आहे.’ यादरम्यान नीता राणीप्रमाणे खुर्चीवर बसलेली दिसते. नीताने सनग्लासेससह तिचा लूक पूर्ण केला आहे. फिकट निळ्या रंगाच्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती.

यावेळी पाहुण्यांमध्ये बॉलिवूडचे तीन डॉन अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांचा समावेश होता. ‘डॉन 3’मध्ये शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंग दिसणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग फंक्शनची काल महा आरतीने सांगता झाली. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

जामनगरहून परतताच बिग बींनी केले अंबानींचे कौतुक; म्हणाले, ‘याआधी एवढं भव्य काहीच पाहिले नाही’
तुम्हाला माहितीये का? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी श्रद्धा कपूरचं आहे खास नातं

हे देखील वाचा