नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचा टीझर पाहून अनेक चाहत्यांनी आणि राजकीय नेत्यांनी आपली नारजी व्यक्त करत वाद सुरु केला आहे. यामध्ये लोकांच्या भावना दु:खवल्या आहेत. त्यामुळे आता बॉलिवूडमधील कलाकारंनी देखिल नाराजी दर्शवली आहे. पूर्वी ‘रामायन’ मालिकेतील सीता भूमिकेत झळकणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया (dipika chikhlia) हिने सोशल मीडियाद्वारे आपली प्रतीक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अभिनेते मुकेश कन्ना यांनी देखिल आदिपुरुष टीझरवर टीका केली आहे.
अभिनेता प्रभास (prabhas) याचा नवीन चित्रपट आदिपुरुष या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून तो वादाच्या घेऱ्यात अडकला आहे. या चित्रपटामध्ये रावणच्या भूमिकेत आणि व्हीएफेक्सवर प्रश्न केले जात आहेत. त्यामुळे लोकांच्या भावना दु:खवल्याचे आरोपही या चित्रपटावर लावले आहेत. या चित्रपटाला घेऊन आता बॉलिवूड कलाकारांनी देखिल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आदिपुरुष चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागत आहे. अशातच बॉलिवूडचे अभिनेते मकेश खन्ना यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर या चित्रपटाविषयी प्रतीक्रिया देत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
चित्रपटांचा बहिष्का होत त्याचा संबंध बॉयकॉटशी जोडताना मुकेश खन्ना म्हणतात की, “ज्या वेळी चित्रपटांवर ठिकठिकाणी बहिष्कार टाकला जात आहे, अशा वेळी तुम्ही पुन्हा बोटे दाखवत असाल तर लोक तुमचा हात धरतीलच. तुम्ही धर्माची चेष्टा करत आहेत असे दिसून येत आहे. ना राम, रामासारखा दिसतो. ना हनुमान हनुमानासारखा दिसतो, ना रावण, रावणासारखा दिसतो. मग याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणाल. हे सगळं तुम्ही आपल्या धर्मावर करून दाखवा.”
मुकेश खन्ना यांनी कलाकारांपासून ते चित्रपटाचे दिग्दर्शकावर आपला निशाना साधला आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, “सैफ अली खान (Saif Ali Khan) याने ही भूमिका करत असताना सांगितले होते की,”माला याला विनोदाचे रुप द्यायचे आहे.’ तेव्हाच मी माझी प्रतीक्रिया दिली होती. जेव्हा आपण रामायनाबद्द बोलतो तेव्हा याचाअर्थ असा होतो की, आपल्याला रामायणाचा फायदा घ्यायचा आहे. आमच्या धर्माची खिल्ली उडवणारे तुम्ही कोण? तुमच्या धर्माबद्दल काही बोलून दाखवा. तुमच्यात हिम्मत आहे का?”
मुकेश खन्ना यांनी पुढे सांगितले की, “आमच्या मनात रामाची जी छवी आहे त्याला कधीच मीशा आणि दाढी नसते. जे लोक हनुमानची पुजा करतात त्यांना देवाची प्रतिमा चांगलीच माहित आहे. तुम्ही हनुमानला असे दाखवणार आहात. अता तुम्ही म्हणनार की, हा तर फक्त टीझर आहे. जर चित्रपटाच्या वरचं कवर असे असेल तर चित्रपट कसा असेल?. तुम्ही याला आदिपुरुष म्हणतात तर माझी काहीच हरकत नाही, पण तुम्ही प्रमोशन करताना ‘रामायन’ म्हणताय. बहुबलीला राम बनवले आणि सैफ अली खानला रावण बनवले. अनेक लोक मला विचारतील की, तुम्ही कोण आहात असे बोलणारे. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, असा विश्वासाचा घात करुन तुमचे चित्रपट चालणार नाहीत. भले तुम्ही 450 कोटी गुंतवणूक करा, पण एकदा जर तुच्या चित्रपटावरुन लोकांनी विश्वास काढून घेतला तर तुम्ही कुठेच नाही राहणार. आजकाल कुम्ही पाहातच असाल की, चित्रपट कशाप्रकारे बॉयकॉट होत आहेत. चित्रपट चालत नाहीत.”
मुकेश यांनी स्वत:ची प्रतिक्रिया देत पुढे सांगितले की, “रामला मिश्या दाखवल्या आहेत. आता मला माहित नाही की, लेक याला कितपत स्वीकारतील. पण मी रावणाकडे पाहात आहे की, म्हणत आहे की तो, खिलजी सारखा दिसत आहे पण खरं तर त्याला मोघल भूमिका दिली आहे. कुठे रामायण आणि कुठे मोघल रुप, तुम्ही थट्टा करत आहात का? ‘नाही चालनार असे.’ अश्या प्रतिक्रिया येतील. फक्त चांगले व्हीएफेक्स वापरुन महाभारत बनवता येत नही. तुम्ही रामाची भूमिका देऊन या चित्रपटाला रामायन नका म्हणू. ही चांगली लक्षणे नाहीत.” लोक यावर प्रतिक्रिया देतील. अशा तिखट शब्दात मुकेश यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि काही गोष्टी समजावून सांगितल्या आहे. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलहोत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी निर्मात्यांना केले कंगाल, बजेटचा पैसाही मिळवून देण्यात ठरले अपयशी
कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ वर राहुल रॉयने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आशिकीचा रिमेक…