Friday, March 29, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी निर्मात्यांना केले कंगाल, बजेटचा पैसाही मिळवून देण्यात ठरले अपयशी

बॉलिवूड इंडस्ट्रीत बिग बजेट चित्रपट बनवणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. निर्माते चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत आणि पैसा गुंतवतात. उदाहरणार्थ, 400 कोटींमध्ये बनलेल्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1: शिवा’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. पण असे अनेक चित्रपट आहेत, जे त्यांच्या बजेटचे पैसेही वसूल करू शकले नाहीत. चला तर जाणून घेऊया अशाच 8 चित्रपटांबद्दल…

या क्रमातील पहिले नाव अक्षय कुमार(Akshay Kumar) स्टारर ‘सम्राट पृथ्वीराज’ या वर्षीच्या जूनमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाl येते. मानुषी छिल्लरने या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 300 कोटींमध्ये बनला होता. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाने एकूण 90 कोटींचे कलेक्शन केले.

या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झालेला कंगना रणौत(Kangana Ranaut) हिचा ‘धाकड’ हा चित्रपट 85 कोटी रुपयांमध्ये कमावला होता. यासोबतच ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. धाकड हा चित्रपट हजारो स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता, मात्र प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे तो अनेक स्क्रीन्सवरून काढून टाकण्यात आला होता. या चित्रपटाने केवळ 2.58 कोटींचे एकूण कलेक्शन केले.

2019 मध्ये मल्टीस्टारर चित्रपट ‘कलंक’ हा करण जोहरचा(Karan Johar) ड्रीम प्रोजेक्ट होता. या चित्रपटात वरुण धवन, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात कियाराचा एक आयटम नंबरही होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच फ्लॉप झाला. हा चित्रपट 150 कोटी रुपयांमध्ये बनला होता, मात्र देशात केवळ 78 कोटींचा व्यवसाय करू शकला.

‘झिरो’ हा 2018 साली प्रदर्शित झालेला मल्टीस्टारर चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा(Anushaka Sharma) आणि कतरिना कैफ होत्या. हा चित्रपट 200 कोटींमध्ये बनला होता. या चित्रपटाला 100 कोटींचा गल्ला जमवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मात्र चित्रपटाने केवळ 178 कोटींची कमाई केली.

सलमान खान(salman Khan) आणि सोहेल खान स्टारर ‘ट्यूबलाइट’ हाही बिग बजेट चित्रपट होता. हा चित्रपट 135 कोटी रुपयांमध्ये बनला होता. त्यातून केवळ 100 कोटी रुपये जमा झाले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ वर राहुल रॉयने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आशिकीचा रिमेक…”

आई काजोलसोबत मुलगा युगने भाविकांना वाढले जेवण; चाहते म्हणाले, “छोटा सिंघम…”

हे देखील वाचा