Sunday, May 19, 2024

कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ वर राहुल रॉयने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आशिकीचा रिमेक…”

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट यांचा 1990ला प्रदर्शित झालेला आशिकी या चित्रपटाने सर्वाचे मन जिंकले हाेते. या चित्रपटाची स्टाेरी आणि गाणं आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. आशिकीमध्ये राहुल रॉयने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. अशात सुपरस्टार कार्तिक आर्यन आशिकी चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच ‘आशिकी 3’ करणार आहे. अशातच राहुलने मुलाखतीदरम्यान ‘आशिकी 3’ चित्रपटाबद्दल वकत्वय केले आहे. 

काही दिवसांपूर्वी, बॉलिवूडचे लाेकप्रिय कलाकार कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘आशिकी 3’ चे मोशन पोस्टर रिलीज करून त्याच्या आगामी चित्रपटाची पुष्टी केली. महेश भट्ट आणि मोहित सुरी यांच्यानंतर, दिग्दर्शक अनुराग ‘आशिकी 3’ साठी राहुल रॉयने कार्तिक आर्यनसाेबत संवाद साधला आणि म्हणाले की, “मी कार्तिकला ही महान फ्रेंचायझी सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.आतापर्यंत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही, परंतु मला आशा आहे की, ते लवकरच होईल. सध्या कार्तिक आर्यन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मला आशा आहे की, तो असाच प्रवास चालू ठेवेल.”

यादरम्यान एका मुलाखती राहुल राॅयने आशिकी 3 ला घेऊन एक माेठे वकत्वय केले आहे. राहुलच्या मते, आशिकी सारख्या चित्रपटाचा रिमेक होऊ शकत नाही. चित्रपट निर्मात्यांना माझी विनंती आहे की, “आशिकीच्या तिसर्‍या भागात चित्रपटाचे सार जिवंत ठेवावे. आशिकी 3 रोमांचक असेल यात मला शंका नाही. कार्तिक आर्यनसाठी हा चित्रपट करणं एका मोठ्या संघर्षापेक्षा कमी नसेल. तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे, त्याने आतापर्यंत एकापेक्षा जास्त चित्रपट साइन केले आहेत.” राहुलने कार्तिकला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्यात.

काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिकला एका एअरपोर्टवर पाहिले होते. तेव्हा तो ‘राष्ट्रीय युवा सम्मेलन 2022’ मध्ये भाग घेण्यासाठी राजस्थान जोधपुर मध्ये पोहोचला होता. कार्तिक जेव्हा जोधपूर हवाई अड्ड्यावर  पोहोचतो तेव्हा त्याला एक लहान मुलगा त्याच्या नावाने हाक मारतो तेव्हा तो लगेच त्या मुलाकडे जातो आणि आपल्या छोट्या फॅनच्या भावना न दु:खवता त्याच्यासोबत कही फोटो क्लीक करतो. कार्तिक आर्यन ‘भुल भुलैया2’ पासून त्याची फॅनफोलोवींगमध्ये खूपच वाढ झाली आहे. नवीन कलाकारांपैकी चाहत्यांमध्ये कार्तिक आर्यनची ‘क्रेज’ जास्त असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाला चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, “रामायनाची गोष्ट आहे का व्हीएफएक्स?

प्रख्यात अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टी शोकसागरात

हे देखील वाचा