Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

झी महागौरव पुरस्कार सोहळ्यात मुक्ता बर्वेने पटकावला ‘या’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

कलाकार वर्षभर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. वर्षभर आपल्या जिवंत आणि प्रभावी अभिनयासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या कलाकरांना पुरस्कारांच्या मार्फत पाठीवर एक शाबासकीची थाप नेहमीच मिळत असते. आपल्या कामाबद्दल मिळणारे हे पुरस्कार प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणादायक आणि सुखकारक ठरतात. आपल्या अभिनयाचे होणारे चीज आणि त्याचीच एक पोचपावती म्हणून पुरस्कार स्वीकारताना सर्वच कलाकारांना आनंद होत असतात. नवीन वर्षाची सुरुवात झाली की, चाहूल लागते ती विविध पुरस्कार सोहळ्याची. यावर्षी तब्ब्ल दोन वर्षांनी मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले गेले. नुकताच अतिशय मोठा आणि मानाचा असा समजला जाणारा झी महागौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

यावर्षी या सोहळ्यामध्ये २००० ते २०२२ या तब्बल २१ वर्षांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘जोगवा’ सिनेमासाठी तिला हा पुरस्कार दिला गेला. मुक्ता मराठी मनोरंजनविश्वातील चतुरस्र अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नाटक, चित्रपट, मालिका आदी सर्वच माध्यमांमधून मुक्ताचे तिच्या प्रभावी अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुक्ताने नेहमीच तिच्या विविध भूमिकांमधून तिच्यामध्ये असणाऱ्या ताकदवान अभिनेत्रीला सर्वांसमोर सिद्ध केले आहे.

मुक्ताला या मिळालेल्या पुरस्कारानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचे आभार मनात तिचा आनंद व्यक्त केला आहे. मुक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “झी मराठी चे खूप खूप आभार. २०००-२०२२ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी. जोगवाच्या सगळ्या टीम ची आठवण आली.” यासोबतच तिने दोन फोटो देखील पोस्ट केले असून, एका फोटोमध्ये तिला अभिनेत्री करिश्मा कपूरकडून पुरस्कार दिला जात आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिला मिळालेला पुरस्कार दिसत आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर मुक्ता म्हणाली, “झी महागौरवचा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप छान वाटलं. तो दिवसच खूप छान होता. मला ती संकल्पनाच खूप आवडली. झी गौरवच एकविसावं वर्ष. माझ्या करिअरला आता २० वर्ष झालं. तसेच करिष्मा कपूरच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा पण आनंद आहे.”

मुक्ताने एक डाव धोबीपछाड, जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, लग्न पहावे करून, गणवेश, हृदयांतर, वेडिंग चा शिनेमा आदी चित्रपटांमधून तर अग्निहोत्र, लज्जा, एका लग्नाची दुसरी गोष्ट , रुद्रम, अजूनही बरसात आहे आदी मालिकांमधून तिने अमाप प्रेम मिळवले. कोडमंत्र, सखाराम बाईंडर, लव्ह बर्ड्‌स, कबड्डी कबड्डी, हम तो तेरे आशिक हैं तर आदी नाटकांमधून तिने उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

 

 

 

 

 

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा