Monday, March 30, 2026
Home बॉलीवूड कोर्टाने घेतला सलमानच्या बाजूने निर्णय; ‘हिट ऍंड रन’ प्रकरणी बनवलेल्या ‘सेलमोन भोई’ या ऑनलाईन गेमवर बंदी

कोर्टाने घेतला सलमानच्या बाजूने निर्णय; ‘हिट ऍंड रन’ प्रकरणी बनवलेल्या ‘सेलमोन भोई’ या ऑनलाईन गेमवर बंदी

बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खानच्या अडचणीत सध्या ब्रेक लागला आहे. सलमान खानला मुंबईच्या सिव्हिल कोर्टाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने ‘सेलमोन भोई’ या ऑनलाइन मोबाईल गेमवर तात्पुरती बंदी घातली आहे. या गेमच्या विरोधात सलमान खानला कोर्टात पोहचला होता. त्याचबरोबर मुंबई दिवाणी कोर्टाने न्यायाधीश के. एम जयस्वाल यांनी या गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

खरं तर, ही गेम सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर सलमान खानचे नाव जोडून या गेमला नावही देण्यात आले आहे. सलमानचे चाहते त्याला सलमान भाई म्हणतात आणि या गेमच्या निर्मात्याने त्याला ‘सेलमोन भोई’ असे नाव दिले. (Mumbai Civil Court has given a sigh of relief to ‘Bhaijan’)

यामुळे सलमानची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप सलमान खानने केला आहे. सलमान खानच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी गेम त्वरित बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. न्यायालयाने गेम मेकर पॅरोडी स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या संचालकांना गेम आणि सलमान खानशी संबंधित कोणत्याही सामग्रीचे प्रसारण, सादरीकरण, पुनरुत्पादन करण्यास बंदी घातली आहे.

न्यायालयाने गेमच्या निर्मात्यांना गूगल प्ले स्टोअर आणि इतर प्लॅटफॉर्मवरून गेम त्वरित काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाने म्हटले की, गेम आणि त्याचे फोटो पाहता असे दिसते की, तो फिर्यादी अर्थात सलमान खानच्या ओळखीशी जुळतो आणि ‘हिट अँड रन’ प्रकरणाशी संबंधित आहे. न्यायालयाने म्हटले की, सलमान खानने या गेमसाठी कधीही संमती दिली नाही.

आदेशात म्हटले आहे की, “जर सलमान खानने या गेमच्या निर्मितीसाठी आपली संमती दिली नाही, तर निर्मात्यांनी निश्चितपणे त्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. त्याची प्रतिमा देखील खराब झाली आहे.” कोर्टाने असेही म्हटले आहे की, “गेमच्या निर्मात्यांनी सलमान खानची ओळख आणि लोकप्रियता आर्थिक फायद्यासाठी वापरली आहे.”

त्याचबरोबर या प्रकरणाचा अंतिम निर्णय काय आणि असा लागतो हे पाहण्यासारखे आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा