Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड मुंबईत गायक कुमार सानूचे नाव घेऊन फसवणूक करायचे लोक, महिलेची झालेली 40 लाखांची फसवणूक

मुंबईत गायक कुमार सानूचे नाव घेऊन फसवणूक करायचे लोक, महिलेची झालेली 40 लाखांची फसवणूक

कुमार सानूच्या नावाने एक महिला फसवणुकीची बळी ठरली आहे. झूमवर झालेल्या बैठकीत कुमार सानूला पाहून महिलेने लाखो रुपये एका कंपनीत गुंतवले. नंतर त्याच्यासोबत फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

अनेकदा चाहते त्यांच्या आयुष्यातील अनेक निर्णय सेलिब्रिटींच्या प्रभावाखाली घेतात. पण एका महिलेला असे करणे अवघड गेले. त्यामुळे महिलेला आर्थिक फटका बसला आहे. खरे तर असे घडले की ,गायक कुमार सानू (Kumar Sanu)याच्या नाव वापरून दोन ठगांनी एका व्यावसायिक महिलेला ९९०० डॉलर्स गुंतवण्याचे आमिष दाखवून ४०.४४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी आधी महिलेचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिला क्रिप्टोकरन्सी लॉन्च करणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीमध्ये ९९०० डॉलर्स आमिष दाखवून ४०.४४ लाख रुपये लुटले.

दिपू साहू आणि बिमन दास अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी महिलेला तिच्या ५० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज १.५% परतावा देण्याचे वचन दिले आणि बॉलीवूड गायक कुमार सानू त्यांच्या गुंतवणूक योजनेशी संबंधित असल्याचे देखील सांगितले होते.

झूम कॉल घेण्यासाठी महिलेवर दबाव
रितुपर्णा मोहंती (३३) असे तक्रारदार महिलेचे नाव असून ती बोरिवली पूर्व येथे राहते. ती तिच्या पतीसोबत वैद्यकीय व्यवसाय करते आणि आरोपी साहू हा गेल्या दोन वर्षांपासून तिच्या कंपनीचा ग्राहक आहे. या वर्षी एप्रिलमध्ये, साहूने पीडित महिलेला ऑस्ट्रेलियन कंपनीबद्दल सांगितले आणि कंपनीच्या मालकाशी झूम कॉल घेण्याचा आग्रह धरला. ही महिला त्या बैठकीला हजर होती ज्यामध्ये आरोपी साहू तीन परदेशी आणि फ्लेमिंग कंपनीची स्थापना करणारे विमान दास यांच्यासह उपस्थित होते.

त्यांनी सांगितले की, त्यांचे मुख्य कार्यालय ऑस्ट्रेलियात आहे. तर भारतात कंपनीचे कार्यालय कोलकाता येथे आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी दासने कंपनीत ५० लाख रुपये गुंतवताना दररोज १.५ टक्के व्याज आणि भांडवलाचा १.५ टक्के परतावा देऊ केला होता. दास यांनी दावा केला की बॉलीवूड गायक कुमार सानू यांच्याकडे देखील कंपनीमध्ये नॉन-फंगीबल टोकन (NFT) आहे.

महिलेला पैसे देण्यास नकार दिला
दास यांनी असाही दावा केला आहे की, त्यांच्या कंपनीने गेल्या काही वर्षांत बाजारातून ६,000 कोटी रुपये काढले आहेत आणि YO Coin आणि Fast BNB सारख्या क्रिप्टोकरन्सी देखील लॉन्च केल्या आहेत. पीडित महिलेने सांगितले की, कुमार सानूबाबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत मी कंपनीवर विश्वास ठेवून ४०.४४ लाख रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला. मला दीपू साहू यांनी सांगितले होते की, माझ्या सर्व गुंतवणुकीची स्थिती आणि परतावा मेटामास्क मोबाईल अ‍ॅपवर पाहता येईल.म्हणून, मी अ‍ॅप डाउनलोड केले परंतु मला मिळालेला गुंतवणूक परतावा अ‍ॅपमध्ये दिसत नव्हता. त्यामुळे मी साहू यांना याबाबत विचारले असता त्यांनी मला सांगितले की गुंतवणूकदारांनी ५० लाख रुपये गुंतवले तरच फायदा होईल. महिलेने अनेकदा पाठपुरावा केला असता साहूने तिला तिचे पैसे परत मिळणार नसल्याचे सांगितले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी साहू आणि दास यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (विश्वासाचा भंग) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

केवळ अभिनयासाठी नाही तर डान्ससाठी देखील प्रसिद्ध होते शम्मी कपूर, या आजाराने त्यांचा जीव घेतला

‘देवों कें देव महादेव’ बनून घराघरांत पोहोचला मोहित रैना, जाणून घ्या काही रंजक किस्से…

मनोज बाजपेयी यांची विसरलेली चप्पल पंकज त्रिपाठीने का ठेवली होती सांभाळून?, कारण वाचून तुम्हालाही कोसळेल रडू

 

हे देखील वाचा