‘सुपरस्टार सिंगर २’ सोबत पवनदीप राजनचा नवा प्रवास सुरू, अरुणिता कांजीलालचीही होणार एन्ट्री?

‘इंडियन आयडल सीझन १२’चा (Indian Idol Season 12) विजेता बनल्यानंतर पवनदीप राजन (Pawandeep Rajan) यशाच्या उंचीवर आहे. शो संपल्यानंतर देखील तो ज्या प्रकारे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे, ते अतिशय प्रशंसनीय आहे. मात्र, याचे सर्व श्रेय त्यांच्या मेहनतीला आणि जबरदस्त गायकीला जाते. कदाचित त्यामुळेच आता पवनदीपच्या हातात नवा प्रोजेक्ट आला आहे.

नवीन शोमध्ये पवनदीपची एन्ट्री
‘सुपरस्टार सिंगर सीझन १’नंतर सोनी टीव्ही ‘सुपरस्टार सिंगर’चा (Superstar Singer 2) नवीन सीझन घेऊन येणार आहे. हा सोनी टीव्ही शो लहान मुलांसाठी असेल. आनंदाची बातमी म्हणजे ‘सुपरस्टार सिंगर २’ चे नेतृत्व पवनदीप राजन करणार आहे. पवनदीप राजन छोट्या गायकांना गाण्यासाठी ट्रेंड करताना दिसणार आहे. ‘सिंगिंग का कल’ही ‘सुपरस्टार सिंगर २’च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर गाजणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Pawandeep Rajan (@pawandeeprajan)

पवनदीप राजनने ‘इंडियन आयडॉल १२’ मधून खूप फॅन फॉलोविंग मिळवले आहे. अर्थात, ‘सुपरस्टार सिंगर २’ मध्ये पवनदीपचे येणे सोनी टीव्हीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. याद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पवनदीपच्या मधुर आवाजाचा आनंद घेता येणार आहे. पवनदीपचे नाव समोर आल्यानंतर अरुणिता कांजीलालच्या (Arunita Kanjilal) नावाची देखील चर्चा आहे. पण शोमध्ये अरुणिताची एन्ट्री होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

View this post on Instagram

A post shared by Pawandeep Rajan (@pawandeeprajan)

पवनदीपने केले आभार व्यक्त
पवनदीप राजनला नेहमीच चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. छोट्या पडद्यावर नवीन सुरुवात केल्याबद्दल पवनदीपने त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘सुपरस्टार सिंगर २’च्या माध्यमातून आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यास उत्सुक असल्याचे गायक सांगतो. पवनदीप सांगतो की, त्याचा नवा प्रवास रंजक असणार आहे. त्याचबरोबर पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post