Sunday, February 23, 2025
Home कॅलेंडर Spruha Joshi | माझं लाडकं Book, व्हिडिओत पुस्तकाबद्दल बोलताना ‘त्या’ एका आठवणीने भावूक झाली स्पृहा

Spruha Joshi | माझं लाडकं Book, व्हिडिओत पुस्तकाबद्दल बोलताना ‘त्या’ एका आठवणीने भावूक झाली स्पृहा

मराठी (Marathi) सिनेविश्वातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणूनही स्पृहाची विशेष ओळख आहे. सिनेविश्वात सक्रिय असणारी स्पृहा जोशी (Spruha Joshi) समाज माध्यमांवरही भरपूर अ‍ॅक्टिव्ह असते. अगदी इन्स्टाग्रामवर विविध सण-समारंभ यांच्या अनुषंगाने फोटो शेअर करणे असो की, युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे असो; सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पृहा नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडून असते. (Actress Spruha Joshi Social Media Video and Photos)

अभिनेत्री स्पृहा जोशी (Marathi Actress Spruha Joshi) सध्या एका खास गोष्टीमुळे चर्चेत आहे. आणि ती बाब म्हणजे यूट्युब (YouTube) या व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप्लिकेशनवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पृहा सध्या स्वतःचे अनुभव कथन करणारे आणि अनेक विषयांवर मत प्रदर्शित करणारे व्हिडिओ अपलोड करत आहेत. (Spruha Joshi Video On YouTube) तसे पाहता मागील वर्षीच अशाप्रकारची मालिका स्पृहाने सुरु केली होती. मात्र, चित्रपट आणि इतर कारणांमुळे तिला यात सातत्य ठेवता आले नाही. परंतू, यावर्षी म्हणजेच २०२२मध्ये स्पृहा सातत्याने नवनवीन व्हिडिओ शेअर करत तिच्या चाहत्यांशी जोडून राहत आहे.

नुकताच अभिनेत्री स्पृहाने तिचा एक व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे. ज्यात तीने तीचे आवडते पुस्तक आणि पुस्तक एक्सचेंज करण्याची नवी संस्कृती, यावर आपले अनुभव कथन केलेत. (My Favourite Book Spruha Joshi)

स्पृहाने व्हिडिओत नेमकं काय म्हटलंय?

सोशल मीडियावर सक्रिय असल्याने स्पृहा जोशीला बुक एक्सचेंज (Book Exchange) म्हणजेच पुस्तकांची अदलाबदल या नव्या प्रकाराबाबत माहिती मिळाली. ‘तृष्णाकर्ष’ या पुस्तकाचा लेखक असणारा मित्र ‘तेजस मोडक’ (Tejas Modak) याच्या अकाऊंट स्टोरीवर स्पृहाला पुस्तकांच्या एक्सचेंजबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यासोबत चर्चा केल्यावर तीला या ऑनलाईन संस्कृतीबाबत अधिक समजले आणि तिथूनच तिनेे स्वतःही त्यात सहभाग नोंदवला.

आपल्या संपूर्ण अनुभवाबद्दल बोलताना स्पृहाने पुस्तक लव्हर्स आणि नव्या पुस्तकांची झालेली भेट, यावर व्हिडिओमध्ये भरभरून सांगितलं आहे. (My Experience with Book Exchange) तसेच, यूट्यूबवर 100k म्हणजेच १ लाख सब्स्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपण स्वतः ऑफलाईन स्वरुपातून पुस्तकांची देवाणघेवाण करणार, असा मानसही स्पृहा जोशीने बोलून दाखवलाय.

हेही वाचा – व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रितेश देशमुखने प्रेमवीरांना सल्ला देत काढला चिमटा

माझं अत्यंत लाडकं पुस्तक? (My Favourite Book | Spruha Joshi)

व्हिडिओच्या मुळ विषयाबद्दल बोलताना अभिनेत्री स्पृहाने (Actress Spruha Joshi) आयुष्यातील अनेक आठवणी कथन केल्या आहेत. मागील एका व्हिडिओवर एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना, स्पृहाला तिच्या आवडत्या पुस्तकाबद्दल बोलायला सांगितले होते. आणि चाहत्याच्या विनंतीचा मान ठेवून स्पृहाने हा व्हिडिओ बनवला. ज्यात तिने तिच्या अत्यंत आवडीच्या आणि लाडक्या अशा पुस्तकाबद्दल भरभरून सांगितलं आहे. तसेच एक हळवी आठवणही स्पृहा जोशीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

आवडते पुस्तक आणि आयुष्यातील हळवी आठवण चाहत्यांसोबत शेअर करणारा अभिनेत्री स्पृहा जोशीचा व्हिडिओ पाहा;

स्पृहाने तिच्या या संपू्र्ण व्हिडिओत स्वतःचे लाडके पुस्तक म्हणजेच जोनाथन लिविंगस्टोन सिगल (jonathan kivinston seagull) याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यातील एक विशेष बाब म्हणजे, तिला हे पुस्तक लहानपणी ‘बालश्री’ पुरस्कार मिळाल्यानंतर भेट स्वरुपात मिळाले होते. त्यामुळे त्या पुस्तकाबद्दलची एक हळवी आठवण व्हिडिओतून स्पृहाने सांगितलीये. ज्यात हे पुस्तक भेट देणारे तिच्या ‘बालमोहन विद्या मंदीर शाळेचे’ विश्वस्त ‘गुरुप्रसाद रेगे’ यांच्याबद्दल स्पृहाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. (My Experience with Book Exchange Video Spruha Joshi Favourite Book YouTube)

अधिक वाचा –

हे देखील वाचा