Wednesday, July 2, 2025
Home मराठी स्पृहा जोशीचा नवीन चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणार जबरदस्त केमिस्ट्री

स्पृहा जोशीचा नवीन चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणार जबरदस्त केमिस्ट्री

अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा ती तिच्या लिखाणामुळे चर्चेत येत असते. तसेच अनेकवेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने सोशल मीडियासार तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. ती म्हणजे पुढील वर्षात एका नव्या चित्रपटात एक नव्या भूमिकेत दिसणार आहे.

स्पृहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या आगामी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. तिने ट्विटरवर तिचा आगामी चित्रपट ‘कॉफी’चा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये आपण पाहू शकतो की, तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दिसत आहे. पोस्टरमध्ये त्या दोघांची केमेस्ट्री बघता क्षणीच समजत आहे. (spruha joshi and siddharth chandekar new movie coffee release soon)

हा पोस्टर शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “प्रेम हे कॉफीसारखं असतं. थोडं गोड थोडं कडवट. पण प्रत्येक क्षणात मजा आहे. १४ जानेवारीला नक्की बघा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.” त्यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. तिने तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा हा ट्रेलर पाहून चित्रपट खूप रंजक असणार आहे याची माहिती मिळते. चित्रपटात त्यांची केमिस्ट्री आणि प्रेमकहाणी भन्नाट असणार आहे याची माहिती हा ट्रेलर पाहून समजते.

स्पृहा तिच्या कवितेमुळे अनेकदा चर्चेतही येत असते. तिने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’ मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’ द्वारे ओटीटी वर देखील पदार्पण केले आहे. अभिनयासोबत स्पृहा एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे. तिने ‘सूर नाव ध्यास नवा’ या गायनाच्या शोचे सूत्रसंचालन केले आहे.

हेही वाचा :

अपयश पचनी पडत नसल्याने राजेश खन्ना यांनी एकदा दारूच्या नशेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न

‘ससुराल गेंदा फुल’, म्हणत देशमुख कुटुंबाने केला अदितीसोबत भन्नाट डान्स

अशाप्रकारे आलिया, कॅटरिना आणि प्रियांका झाल्या ‘जी ले जरा’ चित्रपटासाठी तयार, जोया अख्तरने केला खुलासा

 

हे देखील वाचा