झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका जोरदार चर्चेत आहे. मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे मालिकेला त्याच्या चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच मालिकेत मायरा वैकुळ ही बालकलाकार आहे. मालिकेच्या प्रोमोपासूनच या चिमुरडीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. मालिकेत ती परी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिचा अभिनय देखील सगळ्यांना आवडत आहे.
एवढ्या लहान वयात तिने इतकी सुंदर भूमिका साकारून सगळ्यांना हैराण केले आहे. कोणताही सीन असो, कितीही कठीण डायलॉग असो मायरा अगदी चुटकीत सगळ्या गोष्टी करत असते. त्यामुळे सगळ्यांनाच तिचे खूप कौतुक आहे. अवघ्या ५ वर्षाच्या या परीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, मायरा हा मालिकेतून ब्रेक घेणार आहे. (Myra vaikul take a break from majhi tujhi reshimgath serial)
मायराच्या मामाची लग्नाची गडबड सध्या सुरू आहे. त्यामुळे मामाच्या लग्नासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. ती लग्नासाठी नाशिकला तिच्या कुटुंबासोबत पोहचली आहे. नुकतेच त्यांनी मामाच्या हळदीचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात मायरा खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत.
काही दिवसांपूर्वी मायरा तिच्या कुटुंबासोबत फिरायला गेली होती. त्यावेळी देखील तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यश आणि नेहाचा रोमँटिक ट्रॅक चालू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील मालिका खूप आवडत आहे.
हेही वाचा :
- HBD : आयुष्यात एकदाही कोर्टाची पायरी न चढलेल्या सौरभ शुक्ला यांनी ‘जॉली एलएलबी’मध्ये काम करून जिंकले पुरस्कार
- “इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, लेखिकेच्या पोस्टमुळे वाद
- रणदीप हुड्डाला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, अभिनेत्याच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया