Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील परीने केल्या ‘जुगनू’ स्टेप्स फॉलो, निरागसतेचे तुम्हीही व्हाल फॅन!

मराठी टेलिव्हिजनवर अनेक बालकलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या निरागस आणि गोड अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. पण या वर्षी एका अशा बालकलाकाराची ओळख झाली, जिने मालिकेच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. मालिका सुरू झाल्यापासून तिचे सीन आले की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचा अभिनय पाहून तिच्या प्रेमात पडतात.

ती चिमुकली अभिनेत्री म्हणजे मायरा वैकुळ (Myra Vaikul) होय. मायरा सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेत परीच्या भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हे कलाकार काम करत आहेत. अशातच मायराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Myra vaikul’s dance video in jugnu song viral on social media)

मायराच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘जुगनू’ (Jugnu) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मायराने सुंदर असा ड्रेस घातला आहे. यात ती जुगनू स्टेप्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “मायरच्या स्टाईलमध्ये जुगनू.” तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

 

मायरा ही एक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आहे. यूट्यूबवर तिचे अनेक व्हिडिओ आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळत आहे. तिचा अभिनय सगळ्यांना खूप आवडत आहे. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा