Tuesday, April 16, 2024

‘नागिण’ मालिकेने ‘या’ अभिनेत्रींना केले मालामाल, मानधनाची रक्कम ऐकून घालाल तोंडात बोटे

हिंदी टेलिव्हिजनवरील एकता कपूरचा नागिण हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमाचे सहा सीझन तुफान लोकप्रिय ठरले असून आजही या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळतो. या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर तर गाठलेच पण त्याचबरोबर मालिकेत प्रमुख भूमिका साकारुन अभिनेत्रीही मालामाल झाल्या आहेत. जाणून घेऊया आत्तापर्यंत या मालिकेतील अभिनेत्रींनी घेतलेले थक्क करणारे मानधन..

आजकाल नागिन 6 हा कार्यक्रम  खूप चर्चेत आहे. हा शो बंद होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. इंडियन फोरमच्या रिपोर्टनुसार हा शो लवकरच बंद होणार आहे. वेबसाईटनुसार, शोमध्ये जनरेशन लीप होणार असून त्यानंतर पृथाचे लग्न होईल आणि त्यानंतर ती एका मुलाला जन्म देईल असे दाखवले जाईल. शोचे भविष्यातील कथानक बेबीच्या कथेभोवती फिरणार आहे आणि यादरम्यान अनेक कलाकार या शोला अलविदा म्हणतील. परंतु या कार्यक्रमात आत्तापर्यंत मुख्य भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींचे मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

तेजस्वी प्रकाश:  यामध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिकेसाठी 11-15 कोटी रुपये इतके मोठे मानधन घेतले होते. त्याचबरोबर  मेहक चहल: 10-15 कोटी रुपये , मौनी रॉय: नागिण मालिकेसाठी अभिनेत्री मौनी रॉयने  5 दशलक्ष इतके मानधन स्विकारले होते. तिच्या काळात हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. त्याचप्रमाणे  हिना खान : ५२ कोटी रुपये, सुरभी चंदना : 12 कोटी रुपये, अनिता हसनंदानी: 4 दशलक्ष असे मानधन या अभिनेत्रींनी घेतले होते.

दरम्यान आता लवकरच ही मालिका बंद होणार असल्याचेही वृत्त समोर आले आहे.  7 ऑक्टोबर 2022 रोजी या शोचे शेवटचे टेलिकास्ट होणार असल्याचेही सांगितले जात आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना नक्कीच वाईट वाटेल कारण टीआरपीची अडचण न होता असा निर्णय घेतला जात आहे. मात्र, याविषयी तेजस्वी किंवा शोच्या निर्मात्यांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. शोबद्दल बोलायचे झाले तर, आत्तापर्यंत आपण पाहिले आहे की शोमध्ये ऋषभचा मृत्यू होतो आणि पृथा ऋषभला पुन्हा जिवंत करण्यासाठी तक्षक वागकडून वरदान मागते. त्याचवेळी, येत्या एपिसोडमध्ये शक्ती राज प्रताप सिंह यांच्या बहिणीवर हल्ला करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

एक चुक नडली! ‘या’ टिव्ही कलाकारांना निर्मात्यांनी चालू मालिकेतून दाखवला होता थेट बाहेरचा रस्ता

दिशा पटानीचा बिचवर मस्ती करतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल, बोल्ड, बिंधास्त अदांवर झाले चाहते घायाळ

बाबो! रिलेशनशिपबद्दल ‘हे’ काय बोलली जान्हवी कपूर; म्हणतेय, ‘सध्या मला बॉयफ्रेंड नाही पण तरीही…

हे देखील वाचा