दिशा पटानीचा बिचवर मस्ती करतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल, बोल्ड, बिंधास्त अदांवर झाले चाहते घायाळ

दिशा पटानी (Disha Patani) ही बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दिशाने आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्डलूकने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. दिशाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. जो तिच्या प्रत्येक पोस्टची नेहमीच वाट पाहत असतो. आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेल्या दिशाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती समुद्रकिनारी मजा करत असल्याचे दिसत आहे. 

हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. यामध्ये बोल्ड अभिनेत्री दिशा पटानीचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. सोशल मीडियावर दिशाचे नवनवीन बोल्ड फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी शेअर करताना दिसत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बीचवर मस्ती करताना दिसत आहे. यामध्ये दिशाच्या बोल्डलूकने नेटकऱ्यांना चांगलेच मोहित केले आहे.

दिशा पटानीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर समुद्र किनाऱ्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिशा समुद्राच्या लाटांमध्ये खेळताना दिसत आहे. ऑफ-व्हाइट कलरच्या क्रॉप टॉप आणि शॉर्ट्समध्ये दिशा खूप फ्लॉन्टिंग आणि फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ती स्टायलिश ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटातील ‘गलियान’ हे गाणे व्हिडिओमध्ये मागे वाजत आहे. दिशाचा हा व्हिडीओ चाहत्यांना एवढा आवडला आहे की अवघ्या अर्ध्या तासात त्यावर एक लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

 

दिशाच्या या व्हिडीओवर कमेंट करत लोक तिच्या सौंदर्याची जोरदार प्रशंसा करत आहेत.. एका चाहत्याने कमेंट करताना ‘ओह ब्युटी’ असे लिहिले. दरम्यान  दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपच्या बातम्या अलीकडेच चर्चेत होत्या, मात्र या स्टार्सनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. व्हिडिओवर कमेंट केल्यानंतरही चाहते दिशाला टायगरबद्दल विचारत आहेत. टायगर आणि दिशा यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सिनेजगतात चांगलीच रंगली होती.

हेही वाचा –

‘लग्नानंतर पतीवर अवलंबून राहणे चुकीचे की बरोबर?’, चाहत्याच्या प्रश्नावर काय म्हणाली विद्या बालन?

बाबो! रिलेशनशीपबद्दल ‘हे’ काय बोलली जान्हवी कपूर; म्हणतेय, ‘सध्या मला बॉयफ्रेंड नाही पण तरीही…’

ठरल तर! अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात

Latest Post