दक्षिण फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिचे लाखो चाहते आहेत. त्यामानाने तिचा पती आणि सुपरस्टार नागा चैतन्यचा चाहतावर्ग जरा कमी आहे. पण नुकताच एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामधून त्याच्या चाहत्याचे त्याच्याप्रती असलेले प्रेम दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झालेत.
तुम्ही कधी असा चाहता पाहिलाय का, जो आपल्या सुपरस्टारसाठी उंचीवरून एका नदीत उडी मारेल? होय, नागा चैतन्यच्या एका चाहत्याने त्याच्यासाठी असेच केले आहे. नागा चैतन्य गेल्या काही दिवसांपासून पूर्व गोदावरी भागात त्याच्या आगामी ‘थँक यू’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. नुकताच तो तेथील नदीत नावेतून फिरताना दिसला. हे कळताच आसपासच्या परिसरातील लोक त्या नदीवरील पुलावर जमा झाले. यात नागा चैतन्यचा तो चाहतादेखील होता. नागा चैतन्यच्या या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Neekuna fanism ki avadhulu levu Anna @chay_akkineni ❤️????
Ne cult fanism level veru anthe ????????#ThankYouTheMovie#LoveStoryOnApril16th pic.twitter.com/ImJjKZ4HOj
— Aarya Prasad (@Aaryaprasad) March 2, 2021
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक व्यक्ती नदीवर बांधलेल्या उंच पुलावर उभा आहे. त्याला फक्त त्याच्या सुपरस्टारची एक झलक पाहायची आहे. तो जोरात ओरडतो आणि नागा चैतन्य त्याच्याकडे पाहतो. त्यानंतर तो नदीत उडी मारतो आणि नागा चैतन्यच्या बोटीसोबत पोहू लागतो. यानंतर नागा चैतन्य त्या व्यक्तीला भेटतो आणि त्याच्याबरोबर एक फोटोही काढतो.
वृत्तानुसार असे म्हटले जात आहे की, जेव्हा नागा चैतन्यने या चाहत्याबरोबर फोटो काढला होता, तेव्हा त्याने त्या चाहत्याला कधीही असे न करण्याचा सल्ला दिला.
नागा चैतन्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘थँक यू’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ज्याचे दिग्दर्शन विक्रम कुमार करत आहेत. श्री वेंकटेश्वर क्रिएशन्स निर्मित या चित्रपटाला एस. थम्मान यांनी संगीत दिले आहे. तसेच, या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर 2020 मध्ये सुरू झाले होते आणि येत्या काही महिन्यांत हे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा–
-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर