Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

देशभक्तीच्या रंगात रंगला नकुल मेहता; चाहते म्हणाले, “सावधान होऊन आपल्या लोकशाहीला… “

मंगळवारी (दि. 15 ऑगस्ट) संपूर्ण देश 77वा स्वातंत्र्यदिन जल्लोशात साजरा करत आहे. कलाकार मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. प्रत्येक भारतीय एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहे. सर्वसामान्यांपासून ते विशेषांपर्यंत प्रत्येकजण आजच्या दिवसाचे महत्त्व समजून घेत आहे आणि आपल्या मनातील गोष्ट शेअर करत आहे. दरम्यान, आपल्या कवितांमुळे अनेकदा चर्चेत राहणारा अभिनेता नकुल मेहता यानेही स्वातंत्र्य दिनानिमित्त एक खास कविता म्हटलेली आहे.

नकुल मेहता (Nakul Mehta) यांनी आपल्या कवितेत देशभक्ती आणि राष्ट्रवाद यातील फरक सांगितला आहे. ट्विटरवर त्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “देशभक्ती आणि राष्ट्रवाद यात फरक आहे. 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अजय आणि मी पुन्हा एक खास कविता घेऊन आलो आहोत. देशभक्ती विरुद्ध राष्ट्रवाद.” नकुलने वाचलेली कविता लेखक अजय सिंग यांनी लिहिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नकुलच्या या कवितेवर नेटकरांनी कमेंट्सचा पाऊसच पडला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “सावधान होऊन आपल्या लोकशाहीला वाचवा. अभिमानाने महाराष्ट्रीयन आणि भारतीय आहोत हे सांगा.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की,“हाताने काम करणारा माणूस मजूर असतो. हाताने आणि मेंदूने काम करणारा माणूस कारागीर असतो. पण हाताने, मेंदूने आणि हृदयाने काम करणारा माणूस खरा कलाकार असतो.”

 खरं तर नकुल मेहता आपल्या रोखठोक मतांसाठीही ओळखला जात असुन तो त्यामुळे सतत चर्चेत येतो. तो नेहमी सामाजिक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडताना दिसतो. त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नकुल मेहताने टीव्ही शो ‘प्यार का दर्द मीठा मीठा प्यारा प्यारा’मध्ये दमदार कामगिरी केली आहे. या मालिकेला चाहत्यांनी खूप प्रेम दिले होते. यामधूनच नकुल प्रसिद्धीच्या झोतात आला . यानंतर त्याने ‘इश्कबाज’ मालिकेत शिवायची भूमिका साकारली, जी खूप गाजली.

अधिक वाचा- 
स्वातंत्र्यदिन विशेष!! मराठी अभिनेत्रीच्या खास शुभेच्छांच्या पोस्टचा सोशल मीडियावर महापूर
‘या’ चित्रपटामुळे बद्दल होत अयान मुखर्जीच आयुष्य; ‘असा’ आहे दिग्दर्शकचा जीवनप्रवास

हे देखील वाचा