Saturday, June 15, 2024

कुस्तीपटूंविरुद्धच्या पोलीस कारवाईवर नकुल मेहताची प्रतिक्रिया; म्हणाला,’लज्जास्पद…’

संसदेच्या नवीन इमारतीचे रविवारी (28 मे)ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. एकीकडे हा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे एक धक्कादायक प्रकरण घडले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी दिड महिन्यांपासून कुस्तीपटू आंदोलन करत आहे. तर नव्या संसद भवनाचा उद्घाटना दिवशीच त्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याचं काम दिल्ली पोलीस करताना दिसले. याप्रकारानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दिल्लीच्या जंतरमंतरवर झालेल्या कुस्तीपटू (wrestlers) आणि पोलिसांमधील झटापटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेवर सोशल मीडिया वापरकर्त्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कुस्तीपटूंसोबत झालेल्या गैरवर्तनावर अनेक टीव्ही सेलिब्रेटिंच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. ‘बडे अच्छे लगते हैं 2’चा मुख्य अभिनेता नकुल मेहता (Nakuul Mehta) याने या अपमानास्पद घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना अली गोनी म्हणाला की, “एक वेळ अशी होती, जेव्हा आपण सगळे त्यांच्यासोबत होतो. कारण तेव्हा त्यांनी मेडल जिंकल होत. पण आता त्यांच्यावर वाईट वेळ आहे. तेव्हा मात्र सगळ्यांनी त्यांची साथ सोडली आहे. व्वा, अशा प्रकारे आपल्या भारतातील स्टार्सचा आदर केला जातो…लज्जास्पद.” त्याचवेळी नकुल मेहता म्हणाला की, “हे दृष्य आम्हाला फक्त त्रासदायक नसून खूप दु:खद आहे.”

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करणयात येत आहे. या घटनेनंतर सेहबान अझीम, करिश्मा तन्ना, उर्फी जावेद, अक्षय खरोडिया, रुचिका कपूर, सेहबान अझीम आणि एली गोनी आणि नकुल मेहता यांच्यासह अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Nakuul Mehta biggest reaction to police action against wrestlers)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘चित्रपटांमध्ये प्रेमळ वागते अन् वास्तवात…’, करीना कपूर का हाेतेय ट्राेल? लगेच वाचा
मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू

हे देखील वाचा