Monday, September 16, 2024
Home कॅलेंडर ‘या’ चित्रपटामुळे बद्दल होत अयान मुखर्जीच आयुष्य; ‘असा’ आहे दिग्दर्शकचा जीवनप्रवास

‘या’ चित्रपटामुळे बद्दल होत अयान मुखर्जीच आयुष्य; ‘असा’ आहे दिग्दर्शकचा जीवनप्रवास

बॉलीवूडमध्ये असे अनेक दिग्दर्शक आहेत ज्यांनी खूप कमी वेळात आपले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. बॉलीवूडमध्ये आपल्या सर्वोत्तम चित्रपटांच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणारा दिग्दर्शक अयान मुखर्जी होय‌. त्याने हातांच्या बोटांवर मोजता येतील इतके चित्रपट बनवले आहे. असे असुनही त्याची गणना यशस्वी दिग्दर्शकांमध्ये केली जाते. त्याचा जन्म 15 ऑगस्ट 1983 साली झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याचा जीवनप्रवास.

अयान मुखर्जी (Ayan Mukerji )आणि बॉलीवूडचा खुूप जवळचा संबंध आहे. कारण तो बंगाली आणि बॉलीवूड चित्रपटांचे दिग्गज अभिनेते देब मुखर्जी यांचा मुलगा आहे. याशिवाय अयानच्या कुटुंबात असे अनेक सदस्य आहेत जे थेट सिनेमाशी संबंधित आहेत. त्याचा परिणाम अयानच्या सिनेमॅटिक विचारावरही दिसून येतो. अयानची आजी सती देवी मुखर्जी या दिग्गज किशोर कुमार, अशोक कुमार आणि अनुप कुमार यांच्या बहिणी होत्या. त्याचवेळी अयानचे आजोबा सशधर मुखर्जी हे हिंदी चित्रपटांचे निर्माते होते.

बॉम्बे टॉकीजमधून त्यांनी करिअरची सुरुवात केली. याशिवाय अयानचे काका जॉय मुखर्जी हे 1960 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. तर शोमू मुखर्जी हे देखील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. याशिवाय काजोल, तनिषा आणि राणी मुखर्जी या नात्यात अयानच्या चुलत बहिणी आहेत. अयान मुखर्जीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. मेव्हणा आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत ‘स्वदेश’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यानंतर त्याने हीच भूमिका ‘कभी अलविदा ना कहना’ मध्ये केली होती. मात्र, या चित्रपटानंतर अयानने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला.

अयान मुखर्जीने ‘वेक अप सिड’ मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशाने अयानला इंडस्ट्रीत आपले पाय रोवून उभा राहीला. यानंतर तो ‘ये जवानी है दिवानी’मध्ये दिसला. हा चित्रपटही हिट झाला आणि त्यात यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत अयानचा समावेश झाला. सुमारे 10 वर्षांच्या मेहनतीनंतर अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट बनवला. (Life journey of famous director Ayan Mukerji)

अधिक वाचा- 
हॉटनेसचा तडका! 21 वर्षीय अभिनेत्रीने भर पावसाळ्यात वाढवलं तापमान, पाहा
देशभक्तीच्या रंगात रंगली ‘मुन्नी’, 77व्या स्वातंत्र्यदिनी ‘देस रंगीला’ गाण्यावर केला ‘लय भारी’ डान्स- व्हिडिओ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा