×

‘कसला हॅंडसम आहेस यार तू…!’, नम्रता संभेरावची पतीसाठी खास पोस्ट

आपल्या अभिनयासोबतच कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव (Namrata Sambherao). कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका साकारून तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून, ती चाहत्यांना आपल्या वैयक्तिक जीवनविषयी माहिती देते. अलीकडेच अभिनेत्रीच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने तिने तिच्या पतीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

नम्रताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणतेय की, “प्रिय योगेश, नवरा बायको म्हणून आपल्याला आज 9वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कसला handsome आहेस यार तू असं मी त्याला म्हणले कि तू काय कमी सुंदर आहेस मग, असं म्हणून मला उगाचच सातवे आसमाँ पे चढवणारा माझा नवरा वेळोवेळी मला प्रोत्साहन देत आलाय. साधारण डिलिव्हरी नंतर आई झाल्यावर काम सुरु करायला एक मोठा काळ जातो पण अगदी 3महिन्यात लगेच मी त्याच उत्साहाने कामासाठी करिअर साठी सज्ज झाले त्याचं मूळ कारण म्हणजे योगेश. असाच सोबत रहा मला सहन करत रहा I love you so much yogi. काही होउदे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.” (namrata sambherao share special post for husband on wedding anniversary)

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

अभिनेत्रीची ही पोस्ट चाहत्यांकडून खूप पसंत केली जात आहे. फोटोला लाईक करून चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत.

नम्रता संभेरावच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘फु बाई फु’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा कॉमेडी शोमध्ये काम करून प्रेक्षकांना लोटपोट केलं आहे. शिवाय तिने ‘पुढचं पाऊल’, ‘या गोजिरवण्या घरात’, ‘लज्जा’, अशा मालिकांमध्ये गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. काही चित्रपटांमध्येही अभिनेत्री झळकली आहे.

Latest Post