Saturday, April 20, 2024

‘दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा संपन्न, ‘या’ दिग्गजांना मिळाला सन्मान

नुकताच दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यात संगीत आणि कला क्षेत्रात मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (जीवन गौरव पुरस्कार) महान प्यारेलाल शर्मा यांना भारतीय संगीत आणि सिने उद्योगासाठी प्रदान केला. तसेच, उशा मंगेशकर यांना त्यांच्या योगदानासाठी दीनानाथ पुरस्काराने सन्मानित केले होते. यासोबतच मीना मंगेशकर आणि प्रेम चोप्रा यांना देखील पुरस्कार मिळाला आहे.

भारतीय आणि मराठीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना थिएटर आणि चित्रपटासाठी त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानासाठी दीनानाथ विशेष पुरस्कार मिळाला आहे. तसेच, खासदार आणि सामनाचे संपादक‌ संजय राऊत यांना देखील सन्मानित केले. (Nana Patekar, mala Sinha and prem chopra honored with master deenanath mangeshkar award)

माला सिन्हा यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट अदाकारीसाठी देखील पुरस्कार मिळाला आहे. ज्यांनी गायनात, संगीतात महत्वपूर्ण योगदान दिले आहे, त्यांना दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त हे पुरस्कार दिले आहेत.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुण्यात एका पांजिकृत पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आहे. जे ३१ वर्षापासून संगीत, कला, रंगमंच आणि सामाजिक क्षेत्रात योगदान मिळवलेल्या लोकांना सन्मानित करतात. मागील दोन वर्षांपासून २४ एप्रिल, २०२० आणि २४ एप्रिल, २०२१ रोजी महामारीमुळे हा सोहळा संपन्न होऊ शकला नाही. म्हणूनच मंगेशकर परिवाराने हा सोहळा बुधवारी म्हणजेच २४ नोव्हेंबर, २०२१ रोजी करण्याचा निर्णय घेतला.

या पुरस्कार समारंभाच्या वेळी डॉक्टर राहुल देशपांडे यांचा एक संगीतचा कार्यक्रम देखील होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर हे होते. दीनानाथ मंगेशकर यांच्या ७९ व्या पुण्यतिथीचे आयोजन याप्रकारे केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय

-वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

-ग्लोबल ट्रेंडिंग कपल असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होती पांढरे

हे देखील वाचा