Tuesday, July 23, 2024

अनन्याला करिनाची नक्कल करने पडले महागात, वाढदिवसाच्या दिवशी करावा लागला ट्रोलिंगचा सामना

बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या कारणाने ट्रोल करतील याचा काही भरोसाच नसतो. नुकतंच दिवाळी पार्टीचा सपाटा सुरु झाला होता रोज कोणत्यातरी सेलिब्रटाच्या घरी पार्टी असायचीच ते संपल्यानंतर आता नवीनच सीजन सुरु झाला आहे, तो म्हणजे हॅलोविन पार्टी. ( दि. 29 ऑक्टोंबर) दिवशी पार पडलेल्या हॅलोविन पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्येच अनन्या पांडे हि देखिल आली होती. तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घातला होता, पण तिच्या कपड्यामुळे अभिनेत्रील जाम ट्रोल करण्यात आले.

अनन्या पांडे (Ananya Pandey) आज आपला 24 वाढदिवस साजरा करत असून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. तिने नुकतंच एका पार्टीमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील अभिनेत्री करिना कपूर हिच्या पु भूमिकेतील ड्रेसची नक्कल केली आहे. तिने पार्टीमधील एक व्हिडिओ शेअर केला हेता ज्यामध्ये तिने करिनाची नक्कल केली आहे. त्यामुळे तिच्या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी तिला कॉपी कॅटर म्हटले आहे.

त्याशिवाय करिना कपूर हिनेही (Kareena Kapoor) पार्टीमधला फोटो कोलाज करुन आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन स्टोरी शेअर केला असून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कॅप्शमध्ये लिहिले की, “तू PHAT दिसत होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टार, खूप प्रेम!” PHAT म्हणजे ‘Pretty, Hot And Tempting’ असे म्हणत तिने अनन्याला शुभेच्छा दिल्या आहेत.”

kareenakapoorkhan
photo courtesy: instagram/kareenakapoorkhan

अनन्याने अनेकवेळेस करिनाची नक्कल करण्यचा प्रयत्न केला आहे. 2020 मध्ये तिने करिनाच्या हॉट वुमन वॉन्ट या चॅट शोमध्येही सिल्वर जॅकेटमध्ये दिसली होती, ज्यामागे करिनाचा पू लूक छापलेला होता. तिने करिनाला विचारले की, “मी तुला सांगू का आज माझ्या लूकमागे काय आहे? कारण मला वाटत आहे की, रोमांचक असेल. त्यामुळे मी बनवलेले हे जॅकेट मला तुला दाखवायचे आहे.” तिने हे जॅकेट करिनाला दाखवले ज्यावर ‘गुड लुक्स गुड लुक्स आणि गुड लुक्स’, हा करिनाचा डायलॉग लिहिला होता, आणि पुढच्य बाजूला ‘P.H.A.T- Pretty, Hot And Tempting’ लिहिले होते. हेच आज करिनाने तिचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते. यामध्ये करिनाननेही ट्रोल करण्याची कसर सोडली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिल तो पागल है चित्रपटाला 25 वर्ष पुर्ण, यशराज फिल्मने शेअर केला व्हिडिओ
‘झलक दिखला जा’चा पावरफुल स्पर्धक गश्मीरने बोल्ड सीनवर केले मोठे वक्तव्य, जाणून घ्या एका क्लीकवर

हे देखील वाचा