Monday, April 21, 2025
Home टेलिव्हिजन ‘झलक दिखला जा’चा पावरफुल स्पर्धक गश्मीरने बोल्ड सीनवर केले मोठे वक्तव्य, जाणून घ्या एका क्लीकवर

‘झलक दिखला जा’चा पावरफुल स्पर्धक गश्मीरने बोल्ड सीनवर केले मोठे वक्तव्य, जाणून घ्या एका क्लीकवर

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजन याने मराठीतच नाही तर हिंदी टेलिव्हिनवरही आपली छाप सोडली आहे. मराठी चित्रपटामध्ये लक्षवेधी भूमिका साधून त्याने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीमधील ‘इमली’ नावाच्या मालिकाने अमाप प्रसिद्धी मिळवली असून तो ‘झलक दिखला जा’ कर्यक्रमामध्ये स्पर्धक आहे. व्हिडिओमुळे नेहमी चर्चेत असणार गश्मीर आपल्या वक्तव्यामुळे खूपच चर्चेत आला आहे.

टीव्ही मनेरंजन क्षेत्रामधील काम करत असताना तसेच काही भूमिका साकारत असताना त्याच्यावर गश्मीर महाजन (Gashmeer Mahajan) याने प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे गश्मीर खूपच चर्चेत आला आहे. अभिनेत्याने सांगितले की, ‘मला बोल्ड सिन करायला आवडेल मात्र, ते करत असताना माझ्या काही अटी आहेत. त्या पूर्ण होत असतील तर मला बोल्ड सीन करण्याला काहीच हरकत नाही.” असे गश्मीरचे मत आहे. त्याशिवाय गश्मीरने आपल्या डान्सने झलक दिखलाजामध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या गश्मीर ‘झलक दिखला जा’ मधाील लोकप्रिय स्पर्धक आहे. त्याचे डान्स आणि स्टाईलने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा कार्यक्रम गश्मीर जिंकणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहेत. त्याशिवाय अभिनेत्याने स्टारप्लसवरील ‘इमली’ मालिकेन अनेक लोकांवर भुरळ घातली आहे. त्याचे अनेक चाहते त्याला सपोर्ट करत आहेत त्यामुळे कार्यक्रमामध्ये पावरफुल स्पर्धक म्हणून गश्मीरला ओळखले जाते. त्यामुळे अभिनेताच बाजी मारेल असे सगळ्यांचाच अंदाज आहे.

गश्मीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “मी अॅडव्हरेज डान्सर आहे. यानंतर त्याला विचारले की, ओटीटीवर इंटिमेट सीन्स करण्याविषयी काय सांगशील तेव्हा अभिनेत्याने सांगितले की, माझ्या त्या सीनमुळे संबंधित कलाकृती आणि प्रेक्षकांना भारावून टाकणारं असेल तर मी तो सीन करण्यासाठी तयार असेल, जर स्टोरीला तो सीन प्रभावित करण्यासारखा असेल तर तो सीन मी नक्कीच करेल.”

गश्मीरने डान्स कार्यक्रमामध्ये आपली एक वेगळीच छाप सोडली आहे ज्यामुळे त्याच्या फॅनफॉलॉविंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सोशल मीडियावर लाखो चाहते त्याला फॉलो करत आहेत. त्याचा मोठा चाहता वर्ग त्याला सतत सपोर्ट करत असतो. आता कार्यक्रमाचा विजेता नक्की गश्मीरच ठरेल का? हे पाहणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा