Monday, June 24, 2024

अरे बापरे! कौन बनेगा करोडपतीच्या लहानमुलांवरील एका भागाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल

टेलिव्हिजन विश्वातील सर्वात मोठा, सर्वात यशस्वी आणि सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो ओळखला जातो. ज्ञानाच्या जोरावर स्पर्धकांना कोट्याधीश बनवणाऱ्या या शोचे प्रेक्षकांच्या मनात अतिशय आदराचे आणि जिव्हाळ्याचे स्थान आहे. यंदा या शोचे तेरावे पर्व सुरू असून, लवकरच हा कार्यक्रम १००० वा एपिसोड साजरा करणार आहे. या एवढ्या मोठ्या प्रवासात शोला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले, कधी अनेक वादही निर्माण झाले, मात्र शोच्या लोकप्रियतेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

मात्र आता या शोच्या विरोधात चक्क एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सध्या शोमध्ये लहान मुलांचे स्पेशल भाग दाखवले जात आहे. या भागांपैकी एका भागात असे काही दाखवले गेले, ज्यामुळे लोकं स्तब्ध झाले आहेत. सोनी चॅनेलने देखील ‘त्या’ भागाच्या अनेक क्लिप डिलीट केल्या आहेत.

केबीसी शोच्या लहान मुलांच्या एका भागात एक लहान मुलगी स्पर्धक म्हणून आली होती. त्या मुलीने दावा केला आहे की, ती फक्त पुस्तकाचा वास घेऊन ते वाचू शकते. ही बाब ऐकून शोच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर चॅनेलने देखील त्यांचे उत्तर दिले आहे. सध्या सुरू असलेल्या शोच्या १३ व्या पर्वाच्या ६२ व्या भागातील काही भागावर लोकांनी आक्षेप घेतला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन रेशनलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष असणाऱ्या नरेंद्र नायक यांनी या शो विरोधात तक्रार नोंदवली आहे. नायक यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, “मुलांचे मिड ब्रेन एक्टिवेशन करण्यासाठी अनेक संस्था गरीब आणि सध्या आईवडिलांचे शोषण करतात. आपण अशा चुकीच्या डाव्यांचा प्रसार करून आपल्या देशाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवत आहोत. मिड ब्रेन एक्टिवेशन हा एक असा प्रोग्राम आहे, ज्यात दावा केला जातो की, मुलं या माध्यमाचा वापर करून न बघता वाचू शकतात. मात्र ही थेरी अनेकदा उडवून लावली गेली आहे. नरेंद्र नायक यांच्या सारख्या अनेकांनी या थेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

नायक यांच्या तक्रारीनंतर सोनी चॅनेलच्या एका प्रतिनिधीने उत्तर देताना सांगितले की, ‘आम्ही त्या भागाला सर्वच माध्यमातून आणि विविध प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाकले असून, गरजेनुसार त्याला एडिट देखील केले गेले आहे. आम्ही आमच्या टीमला अधिक काळजी घेण्यासाठी आणि भविष्यात अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी सांगितले आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया नेहमीच कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचा प्रयत्न करतो असते. आम्ही नेहमीच प्रेक्षकांना आवडेल असे काम देण्याचा प्रयत्न करतो. सोबतच कोणाच्याही भावना दुखावल्या जाणून नये याकडे देखील लक्ष दिले जाते.”

लवकरच केबीसी त्यांचा १००० भाग साजरा करणार असून, यावेळी शोमध्ये खास पाहुणे म्हणून अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नातं नव्या नवेली येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा