रणबीर कपूर आणि उदय चोप्रासोबत होत्या अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या अफेअरच्या चर्चा, आता आहे तरी कुठे?

0
150
Photo Courtesy : Instagram/neetu54 & nargisfakhri & udayc

अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने ‘रॉकस्टार’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. रणबीर कपूर आणि इम्तियाज अली यांच्यासह ती पडद्यावर जादू करण्यास यशश्वी झाली होती. या क्षणी अभिनेत्री चित्रपटांपासून दूर असली, तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. तिचा प्रियकर जस्टिन सॅन्टोसशी असलेल्या नात्यात ती खुश आहे. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये तिच्या प्रियकरासमवेत राहत आहे, पण यापूर्वी रणबीर कपूरसोबत नर्गिसच्या अफेअरची चर्चा झाली होती.

रॉकस्टार हा नर्गिसचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. माध्यमांतील वृत्तानुसार, नर्गिस या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीरच्या जवळ आली होती. चित्रपटाचा इतका प्रभाव पडला की, लोकांनी त्यांना एक जोडपे म्हणून पाहण्यास सुरुवात केली होती. हे संबंध मैत्रीपेक्षा जास्त होते. असं म्हणतात की, रणबीरसोबतच्या अफेअरच्या बातमीने नर्गिस खूप नाराज झाली होती.

नर्गिसने एका मुलाखतीत सांगितले होते की, आपले स्वतःचे मित्र देखील आहेत. असं नाही की, रणबीर माझा बालपणीचा मित्र होता. जेव्हा मी येथे नवीन होते, त्यावेळी रणबीरने मला येथे सांभाळून घेण्यास खूप मदत केली होती. नर्गिसने रणबीरसोबत, तिच्या अफेयरच्या चर्चेबद्दल एक अफवा असल्याचे सांगितले होते.

रणबीर व्यतिरिक्त उदय चोप्राशीही नर्गिसचे नाव जोडले गेले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, नर्गिस आणि उदय चोप्रा यांनी जवळजवळ दोन वर्ष एकमेकांना डेट केले होते. असं म्हणतात की, ही बाब लग्नापर्यंत पोहोचली होती, पण शेवटी त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपमुळे नर्गिस इतकी नाराज होती की, त्या रात्री तिने देश आणि बॉलिवूड सोडले होते. तथापि आजपर्यंत, नर्गिसने बॉलिवूड सोडण्याचे स्पष्ट कारण समजू शकलेले नाही. नर्गिस ‘हाऊसफुल 3’, ‘मद्रास कॅफे’, ‘मैं तेरा हिरो’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली आहे.

सध्या ती अमेरिकन शेफ जस्टिन सॅन्टोससोबतच्या असलेल्या नात्यात खुश आहे. दोघेही बर्‍याचदा सोशल मीडियावर एकमेकांशी फोटो शेअर करत असतात, आणि त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहतात. गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘तोरबाज’ चित्रपटात नर्गिस शेवटची दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-
‘या’ कारणामुळे लोक नर्गिस फाखरीला म्हणायचे ‘प्रेग्नेंट’; अभिनेत्रीने केला हैराण करणारा खुलासा
‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरी बॉलिवूडमधून ब्रेक घेऊन न्यूयॉर्कला का गेली? अभिनेत्रीने सांगितलं चकित करणारं सत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here