‘या’ कारणामुळे लोक नर्गिस फाखरीला म्हणायचे ‘प्रेग्नेंट’; अभिनेत्रीने केला हैराण करणारा खुलासा

0
320
Nargis-Fakhri
Photo Courtesy: Instagram/nargisfakhri

सध्या मनोरंजन जगतापासून दूर असलेल्या नर्गिस फाखरीने (Nargis Fakhri) नुकतेच काही रंजक खुलासे केले आहेत. जेव्हा तिचे वजन वाढले, तेव्हा लोक तिला कसे टोमणे मारायचे हे अभिनेत्रीने सांगितले. रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीने केवळ निवडक चित्रपट केले आहेत आणि सध्या ती मनोरंजन जगतापासून दूर आहे.

View this post on Instagram

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

नर्गिसला ऐकावे लागायचे टोमणे
चित्रपटसृष्टीचं जग बाहेरून जितकं चकाचक दिसतं, तितकंच आतून अंधकारमय आहे. बॉलिवूडमधील कास्टिंग काउचबाबत अभिनेत्री अनेकदा खुलासे करत असतात. याशिवाय बॉडी शेमिंग हा देखील अभिनेत्रींसाठी मोठा मुद्दा बनत आहे. अलीकडेच अभिनेत्री नर्गिस फाखरीने बॉडी शेमिंगबाबत खुलासा केला आहे. तिने सांगितले की, वजन वाढल्यामुळे तिला लोकांकडून टोमणे ऐकावे लागायचे. एवढेच नाही, तर अभिनेत्रीने सांगितले की, यामुळे ती खूप तणावात राहू लागली होती. महत्त्वाचे म्हणजे, यामुळेच ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. (nargis fakhri faced body shaming when she put on her weight)

View this post on Instagram

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

बॉडी शेमिंगचा झाली शिकार
नर्गिस फाखरी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण नुकतीच ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. यानंतर अभिनेत्रीने मुलाखतीत खुलासा केला की, तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. नर्गिसने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी काही काळापूर्वी बॉडी शेमिंगचा सामना केला आहे. इंडस्ट्रीमध्ये असे काही लोक आहेत, जे तुमच्यासाठी कल्पना तयार करतात. त्यांच्या मते, त्यांनी त्यांच्या मनात तुमची जी प्रतिमा निर्माण केली आहे, त्यानुसार तुम्ही दिसावे.”

View this post on Instagram

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

लोक म्हणाले ‘प्रेग्नेंट’
नर्गिस फाखरी पुढे म्हणाली, “जेव्हा मी भारतात आले तेव्हा मी खूप बारीक (स्लिम) होते. यावर सर्वांनी मला थोडे वजन वाढव, असे सांगून त्रास दिला. मग मी वर्कआउट्स करून थोडे वजन वाढवले. जेव्हा माझे वजन वाढले, तेव्हा लोक मला विचारू लागले की, मी प्रेग्नेंट आहे का? मात्र हे माझ्यासाठी खूप मजेदार होते. पण अनेकदा मला खूप वाईटही वाटलं. पण नंतर लक्षात आलं, की मी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तेही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता. कारण तुम्ही कधीच कोणाला संतुष्ट करू शकत नाही.”

View this post on Instagram

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

नर्गिसचे चित्रपट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नर्गिस फाखरीने ‘रॉकस्टार’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. याशिवाय तिने ‘मद्रास कॅफे’, ‘मैं तेरा हीरो’, ‘हाऊसफुल ३’, ‘अजहर’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले. अभिनेत्री अखेरची अभिनेता संजय दत्तसोबत ‘तोरबाज’ चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरी बॉलिवूडमधून ब्रेक घेऊन न्यूयॉर्कला का गेली? अभिनेत्रीने सांगितलं चकित करणारं सत्य
अमृता खानवीलकरचा साडी लूक होतोय व्हायरल! पाहिलात का चंद्राला?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here