Friday, February 3, 2023

‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरी बॉलिवूडमधून ब्रेक घेऊन न्यूयॉर्कला का गेली? अभिनेत्रीने सांगितलं चकित करणारं सत्य

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयाच्या दुनियेत मोठ्या दिमाखात पाऊल ठेवले. पण नंतर एकतर ते स्वतःच इंडस्ट्रीपासून दूर होतात किंवा इंडस्ट्री त्यांना त्यांच्यापासून दूर ठेवते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे नर्गिस फाखरी (Nargis Fakhri), जिने तिच्या ‘रॉकस्टार’ या पदार्पण चित्रपटाने लोकांची मने जिंकली. त्यानंतर ही अभिनेत्री आणखी काही चित्रपट आणि आयटम नंबर्समध्ये दिसली. परंतु ती ‘रॉकस्टार’मध्ये ती ज्योत दाखवू शकली नाही. त्यापेक्षा एक वेळ अशी होती, की नर्गिस मुंबई सोडून न्यूयॉर्कला परतली होती. आता अभिनेत्री मुंबईत परतली असली, तरी तिने असं का केलं हे अभिनेत्रीने उघडपणे सांगितलं आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नर्गिस म्हणाली की, “कुठेतरी मला असे वाटत होते की, माझ्यावर कामाचा दबाव वाढत आहे, त्यामुळे मी खूप तणावात होते. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही मिस करत होते. मला आठवते 2016आणि 2017 मध्ये मला याची जाणीव झाली. या कामातून मला आनंद मिळत नसल्याची जाणीव झाली. मी बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये काम केले, त्यादरम्यान बरेच काही घडत होते. मला ते थांबवायचे होते. माझे मन आणि शरीर यांचा समतोल राखण्यासाठी मला ते थांबवावे लागेल, हे मला जाणवले आणि म्हणूनच मी हे पाऊल उचलले.”

पुढे ती म्हणाली, ”कधी कधी एकटे राहणे अवघड असते, माणूस म्हणून तुम्हाला सपोर्ट सिस्टीमची गरज असते. म्हणून मी न्यूयॉर्कला परत गेले. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना बरेच दिवस भेटले नव्हते. म्हणून जेव्हा मी तिथे परत गेले तेव्हा मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला. आता मी पूर्णपणे निरोगी आहे.”

नर्गिस फाखरी दोन वर्षांनंतर साऊथ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. नर्गिस आता पवन कल्याणसोबत ‘हरी हरा वीरा मल्लू’ या तेलगू चित्रपटात दिसणार आहे. नर्गिसने रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर ती ‘मद्रास कॅफे’, ‘मैं तेरा हीरो’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली. त्याचबरोबर नर्गिसने ‘स्पाय’ या हॉलिवूड चित्रपटातही काम केले होते. नर्गिस २०२०च्या ओटीटी चित्रपट ‘तोबराज’मध्ये शेवटची दिसली होती. ज्यात संजय दत्त आणि राहुल देव सह-कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –
उर्वशीची नवी करामत! व्हिडिओ शेअर करत रिषभ पंतला म्हणाली, ‘आय लव्ह यू’
अमृता खानवीलकरचा साडी लूक होतोय व्हायरल! पाहिलात का चंद्राला?

हे देखील वाचा