Saturday, June 29, 2024

नर्गिस फाखरीने खोलली बाॅलिवूडची पोल; म्हणाली, ‘मला…’

बॉलिवूडच्या या चमकदार दुनियेत जेवढ्या लवकर माणुस मोठा होतो, तेवढ्याच लवकर त्याचा चेहरा कधी पडद्यामागे लपून जोतो कधीच कोणाला कळत नाही. अशाच घटनेला बळी पडलेली अभिनेत्री नर्गिस फाखरी  आहे. तिने इम्तियाज अली याच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये तिचे काम सगळ्यांना आवडले आणि तिला अनेक चित्रपटात कामही मिळाले. मात्र, ती गेल्या दोन वर्षापासून अभिनय क्षेत्रापासून गायब झाली आहे.

नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीहद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे ती ड्रिपेशनच्या आहारी गेली होती. ती या इंडस्ट्रीमध्ये अजिबात खुश नव्हती. सोबतच तिला इंडस्ट्रीतील लोकही चांगले मिळाले नाही. तिने काही चित्रपट करत असतानाचे अनुभवही सांगितले की, “मला डावपेच खेळता येत नाही. मला सांगितले गेले की, मी खूप इमानदार आहे, जी चांगली गोष्ट नाही. तुम्ही भले कोणासोबत बोलण्याला घाबरत असाल किंवा तुम्हाला ते सोयीस्कर नसेल वाटत तरीही तुम्हाला त्याच्या सोबत बोलावेच लागेल. तुम्हाला एक डावपेच खेळत असणारा चेहरा दाखवावा लोगतो जे मला नाही येत. मला समज नसलेली मुलगी म्हणलं गेलं. या इंडस्ट्रीमध्ये लोकांचे तीन चेहरे असतात. एक उद्योगपती, दोन क्रिएटिव, आणि तिसरा वैयक्तिक चेहरा.”

नर्गिस फाखरीने पुढे सांगितले की, “मी बॉलिवूडमध्ये लागोपाठ 8 वर्ष काम केले आहे त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हते. मी मानसिक त्रासामुळे आजारी पडले. सतत आजारपणामुळे हेल्थ इश्यु झाले होते, त्यामुळे मला वाटत होते की, मी डिप्रेशनमध्ये गेले आहे. मी खुश नव्हते आणि नेहमी स्वत:ला एकच प्रश्न विचारत होते की, मी इथे का आहे? असा डिप्रेशनमुळेच मी इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला आहे. ”

असा धक्कादायक खुलासा एकूण सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नर्गिसला आइफा अवॉर्ड्स 2022 मध्ये पाहिले होते. मीडियाशी बोलत असताना तिने सांगितले होते की, सध्या तिच्या हातामध्ये चार स्क्रिप्ट आहेत, ज्याच्यावर अजून काम सुरु आहे. तुम्हा मला पुढच्या वर्षी पुन्हा एकदा पडद्यावर पाहू शकता. मी पुन्हा एकदा ऑनस्क्रीन झळखण्यासाठी वाट पाहात आहे. नरगिसने 2020 मध्ये टोरबाज य़ा चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. यानंर ती दिसेनासी झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांना बिग बींच्या मुलाला बनवायचे होते जावई, पण ईशाने ‘या’ कारणामुळे दिला नकार
हेमा मालिनी यांच्यासमोर संजीव कुमार यांनी ठेवला होता लग्नाचा प्रस्ताव, मात्र ‘या’ अटीमुळे तुटले नाते

हे देखील वाचा