हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचे ७ जुलै, २०२१ रोजी निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. त्यांच्या निधनापासूनच चाहते दिलीप साहेबांच्या आठवणीत डुंबले आहेत. अशातच आता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दिलीप कुमार यांची आठवण काढत त्यांच्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी इंडियन एक्सप्रेससाठी एक आर्टिकल लिहिले. या आर्टिकलमध्ये त्यांनी म्हटले की, दिलीप यांनी नवीन कलाकारांना पुढे जाण्यात कोणतेही योगदान दिले नाही. (Naseeruddin Shah Called Dilip Kumar Finest Actors But Lamented The Actor Never Paseed On The Benefits of His Experience)
ते लिहितात की, “दिलीप कुमारच्या अंदाजाने भारतीय चित्रपटांमध्ये एक प्रतिमा स्थापन केली होती. दिलीपच्या पद्धतीला नंतरच्या अनेक अभिनेत्यांनीही स्वीकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते केवळ नक्कल केल्यासारखे दिसत होते.”
अभिनयाव्यतिरिक्त काहीच नाही केले
आर्टिकलमध्ये त्यांनी पुढे लिहिले की, “ज्या जागी दिलीप कुमार होते, त्यांनी अभिनयाव्यतिरिक्त इतर काहीच केले नाही. ते सामाजिक कार्यात सामील राहायचे. त्यांनी केवळ एका चित्रपटाची निर्मिती केली होती आणि अधिकृतरीत्या कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केले नव्हते.”
अनुभवाचा फायदा पुढे नेला नाही
“दिलीपने कधीच आपल्या अनुभवांचा फायदा पुढे नेला नाही. त्यांनी कोणत्याही नवीन प्रतिभेची पारख केली नाही. १९७०च्या सुरुवातीचे चित्रपट सोडले, तर त्यांनी येणाऱ्या कलाकारांसाठी असा कोणताही धडा दिला नाही,” असे पुढे बोलताना नसीरुद्धीन शाह म्हणाले.
नसीरुद्दीन यांनी असेही म्हटले की, दिलीप कुमार हे देशातील सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक होते. केवळ त्यांचे चित्रपटात असणे कोणत्याही चित्रपटासाठी महत्त्वाचे होते. मात्र, इतके मोठे स्टार असूनही त्यांनी हिंदी सिनेमासाठी काहीच खास केले नाही. विशेष म्हणजे, ‘कर्मा’ चित्रपटात दिलीप कुमार आणि नसीरुद्दीन शाह यांनी एकत्र काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??










