Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड आता खिशाला नाही बसणार फटका! फक्त 75 रुपयात ‘या’ दिवशी पाहू शकता आवडीचा सिनेमा

आता खिशाला नाही बसणार फटका! फक्त 75 रुपयात ‘या’ दिवशी पाहू शकता आवडीचा सिनेमा

कोणताही सिनेमा पाहायचा असेल, तर त्याचे तिकीट हे 100 रुपयांच्या पुढेच असतात. काहींच्या खिशाला परवडत नसल्याने ते चित्रपटगृहाकडे पाठ फिरवतात. मात्र, जर तिकिटांची किंमत ही 75 रुपये केली तर…? तेव्हा कदाचित प्रत्येक सिनेरसिक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात नक्कीच जाईल. आता ही संधी प्रत्येक सिनेरसिकाला मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून 16 सप्टेंबर रोजी देशभरात 75 रुपयांमध्ये तिकीट मिळणार असल्याची घोषणा मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून करण्यात आली होती. मात्र, ही तारीख पुढे ढकलली आहे. असे म्हटले जात आहे की, असोसिएशनने हा निर्णय ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या यशावरून घेतला आहे.

मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (Multiplex Association of India) यांनी राष्ट्रीय चित्रपट दिवस (National Cinema Day) साजरा करण्यासाठी तारीख बदलली आहे. हा खास दिवस 16 सप्टेंबरऐवजी 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

असोसिएशनकडून निवेदन जारी
असोसिएशनने एका निवेदनात म्हटले की, मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि भारतातील सर्व चित्रपटगृहांनी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त सर्व सिनेरसिकांना फक्त 75 रुपयांच्या तिकिटासह एक दिवस चित्रपटगृहात सिनेमा पाहण्याची घोषणा केली होती. आधी हा दिवस साजरा करण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस ठरवण्यात आला होता. मात्र, आता या उत्सवात सहभागी होण्याच्या अनेक संबंधितांच्या विनंतीवरून त्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.”

फक्त 75 रुपयात पाहता येणार सिनेमे
मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, “पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपॉलिस, कार्निव्हल, मीरा, सिटीप्राईड, एशियन, मुक्ता ए2, मूव्ही टाईम, वेव्ह, एम2के आणि डिलाईट यांच्यासह 4000हून अधिक स्क्रीन्समध्ये तुम्ही हा खास दिवस साजरा करू शकता. 23 सप्टेंबर रोजी 75 रुपयात सिनेमाचे तिकीट मिळेल. ‘ब्रह्मास्त्र‘, ‘केजीएफ 2’, ‘आरआरआर’, ‘विक्रम’, ‘भूल भुलैय्या 2’, ‘डॉक्टर स्ट्रेंज’ आणि ‘टॉप गन: मॅव्हरिक’ यांसारखे सिनेमे 75 रुपयांमध्ये पाहू शकता.”

अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीनेही केलेली घोषणा
‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ हा चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि यासाठी असोसिएशन चित्रपट निर्मात्यांचे आभार मानते. याआधी अमेरिकेच्या फिल्म इंडस्ट्री असोसिएशननेही चित्रपट पाहणाऱ्यांसाठी अशीच घोषणा केली होती. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त तिकिटांची किंमत 9 डॉलरवरून फक्त 3 डॉलर करण्यात आली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा हिट करायचा म्हणून सांगितले जातायेत चुकीचे आकडे? बजेटइतकी कमाई करणेही कठीण
महिमाने सगळ्यांसमोर आणलेली बॉलिवूडची काळी बाजू; म्हणालेली, ‘व्हर्जिन अभिनेत्री नसेल, तर…’
‘अगं अगं आई…’, म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा ओंकार दिसणार मुख्य भूमिकेत, पण नायिका कोण?

हे देखील वाचा