Sunday, October 6, 2024
Home कॅलेंडर काय सांगता इतकी मोठी चूक! देशातील ‘या’ मोठ्या संस्थेकडून मौनी रॉयचे फोटो चुकून झाले ट्विट

काय सांगता इतकी मोठी चूक! देशातील ‘या’ मोठ्या संस्थेकडून मौनी रॉयचे फोटो चुकून झाले ट्विट

मौनी रॉय टेलिव्हिजन ते चित्रपट असा प्रवास करणारी सुंदर अभिनेत्री. मौनी नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो, व्हिडिओ, अपडेटस सोशल मीडियावरून नेहमीच तिच्या फॅन्ससोबत शेयर करत असते. अशातच मौनी अचानक खूप चर्चेत आली आहे. त्याचे कारणही खूपच भन्नाट आणि जरा विचित्रच आहे.

झाले असे की, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) म्हणजेच भारताची सर्वात मोठी स्टॉक एक्सचेंज संस्था.  मुंबईत असलेल्या या संस्थेकडून नुकतीच एक चूक झाली आहे. आता तुम्ही म्हणाल मौनी रॉय आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांचा काय संबंध? सांगतो सांगतो, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर अकाऊंटवरून चुकीने मौनी रॉयचे हॉट आणि बोल्ड फोटोज पोस्ट करण्यात आले.

‘सेक्सी डीवा’, ‘हॉट गर्ल’ अशा हॅशटॅगचा वापर करून NCE ने मौनीचे सुंदर ब्लॅक ड्रेसमधील फोटो पोस्ट केले. हे ट्विट चुकीने झाले असल्याचे NCE ने मान्य करून ते ट्विट डिलीट करेपर्यंत NSE चे चुकीचे ट्विट खूप वायरल झाले. NSE च्या इजा चुकीच्या ट्विटला जोरदार ट्रोल करण्यात आले असून त्यावर विविध मिम्स देखील तयार झाले आहे. NSE ने लगेच नवीन ट्विट करत म्हटले आहे की, “आमच्याकडून NSE च्या ट्विटर हँडलवर चुकून एक चुकीची पोस्ट टाकण्यात आली होती. ही पोस्ट आमचे ट्विटर हँडल संभाळणाऱ्या एजन्सीकडून झाली असून ही एक मानवीय चूक आहे. आमचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले नसून, फक्त चुकून ही पोस्ट शेयर झाली आहे. आम्ही आमच्या सर्व फॉलोवर्सच्या झालेल्या असुविधेसाठी माफी मागतो.”

 

NSE कडून माफी मागितल्यानंतरही यूजर्स त्यांना जोरदार ट्रोल करत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘अच्छा तर हा अर्थ आहे, स्टॉक ऑफ द डे चा’. अजून एकाने लिहिले, ‘जर तुम्ही आठवड्याच्या शेवटी देखील कर्मचाऱ्यांना कामावर बोलवलं तर असेच होईल.’ अजून एक नेटकरी म्हणतो, ‘ मार्केटमध्ये थोडी काय उसळी आली, NSE तर मस्तीच्या मूडमध्ये आली.’ अजून एक लिहितो, ‘ जेव्हा नोटिस पिरियडमध्ये काम करणाऱ्या कामगारांना योग्य तो मोबदला दिला जात नाही तेव्हा…’ , ‘पण पोस्ट लई भारी होती’,

मौनी रॉयबद्दल बोलायचे झाले तर, मौनी टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अक्षय कुमार सोबत ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मौनी लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन अभिनित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

वाचा थोडक्यात महत्त्वाचे
तुझी आई अशीच म्हणतेय काय? पाहा रकुलप्रीतने कुणाचा घेतलाय खरपूस समाचार
जरा चुकलंच हां! मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खानची एक चुक आणि सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
काय सांगता इतकी मोठी चूक! देशातील या मोठ्या संस्थेकडून मौनी रॉयचे फोटो चुकून झाले ट्विट
तब्बल सतरा वर्ष फरहान अख्तरने केला सुखाचा संसार, ते लफड झालं अन्

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा