Tuesday, April 23, 2024

तब्बल सतरा वर्ष फरहान अख्तरने केला सुखाचा संसार, ‘ते’ लफड झालं अन्

बॉलिवूड अभिनेता, लेखक, गायक आणि निर्माता फरहान अख्तरने नुकताच त्याचा 49 वा वाढदिवस साजरा केला आहे. फरहान अख्तरने आपल्या कारकिर्दीत चित्रपट इंडस्ट्रीच्या प्रत्येक प्रकारात हात आजमावला आहे आणि विशेष म्हणजे त्यात तो यशस्वीही झाला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण फरहानला चित्रपटसृष्टीमधला अष्टपैलू कलाकार असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्य जास्त चर्चेत राहिलं आहे. 17 वर्षांनंतर तो आणि त्याची पत्नी एकमेकांपासून विभक्त झाले. का आणि कशामुळे आणि सध्या फरहान काय करतोय चला यावर एक नजर टाकूयात.

फरहान अख्तर हा जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा आहे. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली. यानंतर, 2001 मध्ये ‘दिल चाहता है’ या पहिल्या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट सुपरहिट होता आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर फरहान अख्तरने अनेक चित्रपट केले आणि त्याचा दिग्दर्शकीय प्रवास हिट ठरला.

केवळ दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवण्याची फरहानला इच्छा नव्हती. लेखन, गायन आणि अभिनय या क्षेत्रातही त्याने हात आजमावला. या सर्व प्रकारांमध्ये फरहान हिट ठरला. फरहान हा बर्‍याचदा वैयक्तिक आयुष्याविषयीच्या चर्चांचा एक भाग असतो. फरहानने 2000 मध्ये अधुना भाभानीशी लग्न केले. फरहान आणि अधुना यांना दोन मुलं आहेत. परंतु 2017 मध्ये फरहान आणि अधुना वेगळे झाले आणि दोघांचा घटस्फोट झाला. फरहान आणि अधुना यांच्यातील घटस्फोटाचं कारण फरहानचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे सांगितले गेले.

परंतु, त्यापैकी दोघांनीही याबद्दल खुलेपणाने काहीही सांगितलेलं नाही. पण त्यांच्या घटस्फोटाच्या वेळी अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत फरहानचे प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या आहेत. ज्यामुळे त्याच्या आणि अधुना दरम्यान अंतर वाढलं आणि दोघांचा घटस्फोट झाला. माध्यमांत आलेल्या तेव्हाच्या वृत्तांनुसार, श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर यांनाही हे नातं मंजूर नव्हतं. यानंतर फरहान यातून बाहेर पडला परंतू त्याचं नाव दुसऱ्या ठिकाणी जोडलं गेलं.

आजकाल फरहान मॉडेल आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर हिला डेट करत आहे. दोघांनाही बर्‍याचदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. त्याचवेळी या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही वारंवार येत असतात, पण या दोघांनीही याबद्दल आतापर्यंत काहीही सांगितलेल नाही.

फरहान अख्तरच्या प्रमुख चित्रपटांबद्दल बोलायचे तर त्याने दिल चाहता हैं, लक्ष्य, डॉन, पॉझिटिव्ह व डॉन २ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रॉक ऑन, लक बाय चान्स, कार्तिक कॉलिंग कार्तिक, जिंदगी ना मिलेगी दोबारा, भाग मिल्खा भाग, वझिर, रॉक ऑन टू, लखनऊ सेंट्रल, डॅडी, द स्काय इज पिंक व तुफान सिनेमात मुख्य भूमिका निभावल्या आहेत. दिल चाहता हैं, डॉन, रॉक ऑन, झिंदगी ना मिलेगी दोबारा, तलाश, दिल धडकने दो व रॉक ऑन टू सिनेमाच्या कथेचे लेखनही केले आहे.(why farhan akhtar get divorce from wife adhuna and now dating shibani dandekar)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विमानतळावर गीता कपूरने ‘मम्मी’ म्हटल्यामुळे फराह खानचा झाला होता अपमान; शोमध्ये सांगितले किस्सा
अखेर का दिली आईने फरहान अख्तरला घराबाहेर काढण्याची धमकी? वाचा मनोरंजक किस्सा

हे देखील वाचा