मागील काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांचे बालपणीचे फोटो जोरदार व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनाही या फोटोंनी वेड लावले आहे. काही कलाकारांचे फोटो हे असे असतात, जे लगेच ओळखता येतात. मात्र, काही कलाकार ओळखू येत नाहीत. आताही असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोत तीन लहान मुले दिसत आहेत. त्यातील एकाने लाल रंगाचा शर्ट घातलेला आहे. हा लाल रंगाचा शर्ट घातलेल्या शर्टमध्ये दिसणारा अभिनेता खूपच गोंडस दिसत आहे. तो त्याच्या बहिणीसोबत बसलेला आहे, जी बॉलिवूडची सुप्रसिद्ध दिग्दर्शिका आहे. हा फोटो नक्की कोणत्या अभिनेत्याचा आहे, हे ओळखणे चाहत्यांना जरा कठीणच जात आहे.
खरं तर ला रंगाच्या शर्टमध्ये दिसणारा अभिनेता इतर कोणी नसून फरहान अख्तर आहे. तसेच फोटोच्या मध्यभागी बसलेली मुलगी त्याची बहीण जोया अख्तर आहे आणि जोयाच्या बाजूला त्याचा चुलत भाऊ कबीर अख्तर आहे.
फरहानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तो प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. फरहान आता शिबानी दांडेकरला डेट करत आहे. हे दोघे अनेकदा एकमेकांबरोबर खास क्षण घालवताना दिसतात. काही दिवसांपूर्वी फरहान अख्तरने सोशल मीडियावर त्या दोघांचे फोटो देखील शेअर केले होते. शिबानी फरहानपेक्षा ७ वर्षांनी लहान आहे. फरहानचे पहिला लग्न अधुनाशी झाले होते. त्या दोघांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. फरहान अख्तरला अधुनापासुन दोन मुले देखील आहेत. शाक्य आणि अकिरा असे त्याच्या मुलांचे नाव आहे.
फरहानच्या चित्रपट कारकिर्दीबाबत बोलायचं झालं, तर त्याने सन २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत ३८ चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर त्याने सन २००८ मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. यासह त्याने एकूण १४ चित्रपटांमध्ये काम केले.
हेही वाचा-