Friday, February 3, 2023

स्पायडरमॅन सिनेमाचे तिकीट मिळवण्यासाठी शिल्पाला करावी लागते ‘अशी’ कसरत, पाहा हा व्हिडिओ

काही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ दिसून येते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्या सिनेमाची तिकीट संपलेली असतात. असे चित्र खूपच क्वचित पाहायला मिळते. खासकरून हॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या नशीब हा आनंद असतो. लवकरच मार्वल स्टुडिओचा ‘स्पायडरमॅन: नो वे होम’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मागील काही दिवसांपासून तो सतत चर्चेत असून, फॅन्समध्ये चित्रपटाबद्दल खूपच उत्सुकता आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरु झाली असून, तिला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. एवढेच नाहीतर आता काहींना तर सिनेमाची तिकिटे देखील मिळणे अवघड होऊन बसले आहे. आणि हे फक्त सामान्य लोकांसाठीच घडते असे अजिबात नाही कलाकरांना देखील या सिनेमाची तिकिटे मिळणे मुश्किल झाले आहे.

याचाच एक फनी व्हिडिओ शिल्पा शेट्टीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा चक्क स्पायडरमॅनकडेच तिकिटं मागताना दिसत आहे. त्याला अतिशय लाडिक पद्धतीने तिला तिकिटं पाहिजे असल्याचे सांगते. या व्हिडिओमध्ये शिल्पा स्पायडरमॅनसोबत नाचताना दिसत आहे. स्पायडरमॅन तिला कसे बसायचे आणि त्याचे जाळे कसे सोडायचे ते शिकवताना दिसत आहे. शिवाय शिल्पाचे लोकप्रिय गाणे ‘चुरा के दिल मेरा’ याच्या काही स्टेप्स ती स्पायडरमॅनला शिकवते.

मात्र शेवटी स्पायडरमॅन तिला इशाऱ्याने सांगतो की, त्याच्याजवळ सिनेमाचे तिकिटं नाही. त्याचे हे उत्तर ऐकून शिल्पा चिडते आणि म्हणते, “जर मला तिकिटं नाही मिळाली तर मी घरीच जाऊ शकणार नाही आणि विवान मला खूप त्रास देईल.” शिल्पाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, लोकांना तो खूप आवडतानाही दिसत आहे. काही तासातच या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

तत्पूर्वी ‘स्पायडरमॅन नो वे होम’ हा सिनेमा १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून, इंग्लिशसोबतच हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रदर्शनाधीच चित्रपटाला मिळणार प्रतिसाद पाहून हा चित्रपट नक्कीच कमाईच्या नवनवीन रेकॉर्ड बनवेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा