Kiara Advani | अभिनेत्री कियारा आडवाणीची चाहत्यांना खुशखबर, केली कोटीची खरेदी


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणीचा (Kiara Advani) चाहता वर्ग खुप मोठा आहे. कियाराच्या चित्रपटांना तिच्या चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते. नुकतीच तिने तिच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे.

कियाराने तिच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका गाडीचा समावेश केला आहे. नुकतीच अभिनेत्रीने एक ऑडी कार A8L ही आलिशान गाडी घेतली केली आहे. कियाराला लग्झरी गाड्या खूप आवडतात.

कियाराची नवी लग्झरी गाडी
कियाराच्या गाड्यांमध्ये आणखीन एक नवीन गाडी घेतली १५ डिसेंबर ला नवीन गाडीची खरेदी केली.कियाराने काळ्या रंगाची ऑडी A8L लग्झरी गाडी घेतली आहे. या गाडीची किंमत १.५६ कोटी रूपये आहे. ऑडी कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कियाराचा फोटो शेअर केला आहे. कियाराकडे मर्सिडीज बेंस ई क्लास आणि बीएमडब्ल्यू ५३० डी (BMW 530d )या गाड्या देखील आहेत.

हेही वाचा – नोरा फतेहीच्या बोल्ड ड्रेसने केली कॅमेऱ्यासमोरच पंचायत, ‘अशा’प्रकारे सांभाळला खाली घसरत चाललेला ड्रेस

कियाराच्या कबीर सिंह, गुड न्यूज आणि शेरशाह या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. कियाराने शेरशाह चित्रपटात विक्रम बत्रा यांची प्रियसी डिंपली यांची भूमिका साकारली होती. मिळालेल्या माहितीनुसार शेरशाह या चित्रपटासाठी कियाराने ४ कोटी रुपये मानधन घेतले होते.

लवकरच कियारा कार्तिक आर्यनसोबत भूल भूलैया-२ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच कियारा आणि वरूण धवन सोबात लवकरच ‘जुग-जुग जियो’ हा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट २४ जून २०२२ ला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

‘जुग-जुग जियो’चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सेटवर खूप मस्ती केली होती. गेल्या महिन्यात कियाराने सेट वरील एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्यामध्ये वरूण धवन सोबत मस्ती करत मस्त भन्नाट डान्स देखील केला आहे. त्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला दिलजीत दोसांझ गाणं वाजत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कियाराने ‘बीइंग एडल्ट्स’ असे लिहिले होते.

अधिक वाचा –


Latest Post

error: Content is protected !!