Saturday, July 6, 2024

मुघल ए आझम आणि पाकिजा सिनेमाच्या संगीतासाठी ओळखल्या जाणाऱ्या नौशाद यांचा संघर्षमयी प्रवास

हिंदी संगीत क्षेत्रात असे अनेक संगीतकार होऊन गेले ज्यांच्या सदाबहार गाण्यांची आणि जादूई आवाजाची आजही चर्चा पाहायला मिळते. या प्रसिद्ध संगीतकारांमध्ये नौशाद अली यांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. नौशाद अली (Naushad Ali)  यांनी संगीतबद्ध केलेली सदाबहार गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. 25 डिसेंबर 1919 रोजी जन्मलेले नौशाद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त 67 चित्रपटांसाठी संगीत दिले. परंतु त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी ते अजूनही लक्षात ठेवले जातात. हे सर्व त्यांच्या संगीत आणि कौशल्याची कमाई आहे, आजही त्यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. 05 मे 2006 रोजी संगीत जगतातील या दिग्गजाने जगाचा निरोप घेतला. पाहूया त्यांचा संगीत जगतातील प्रवास.

नौशाद अली यांचा जन्म लखनौमध्ये झाला. त्यांना संगीत क्षेत्रात जाण्याची पहिल्यापासून आवड असली तरी हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनचच त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरूवात केली होती. नौशाद अली लहानपणी संगीतातील उपकरणे मिळणाऱ्या दुकानात काम करायचे ज्यामुळे त्यांना हार्मोनियम वाजवायला मिळायचा. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ती या क्षेत्रात यशस्वीही झाले. त्यांच्या लग्नाचा एक किस्सा मात्र चांगलाच गाजला होता.

नौशाद अलीबद्दल अनेक किस्से सांगितले जातात. यातील एक किस्सा असा की, नौशाद साहेबांचे लग्न झाले, त्या वेळी त्यांनी संगीतबद्ध केलेले एक गाणे लग्नात वाजवले जात होते, पण हे कोणालाच कळले नाही आणि तेव्हा नौशादही कोणाला सांगू शकले नाहीत, त्यांनी स्वतः हे गाणे संगीतबद्ध केले आहे. इतकंच नाही तर नौशादच्या सासरच्या मंडळींकडूनही तो पेशाने शिंपी असल्याचं सांगितलं जात होतं, कारण गाणं आणि वादनाशी संबंधित काम त्या काळात चांगले मानले जात नव्हती.

संगीतकार नौशाद अली यांनी 1940 साली ‘प्रेम नगर’ चित्रपटातील गाण्यांना संगीत देऊन आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी प्रथमच संगीतबद्ध केलेली गाणी खूप आवडली होती. यानंतर त्यांनी आपल्या संगीताच्या तालावर अनेक सुंदर गाणी देऊन हिंदी चित्रपटसृष्टीला जिवंत केले. त्यांच्या गाण्यांबद्दल बोलायचे झाले तर मुघल-ए-आझम या चित्रपटाचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत अव्वल स्थानावर घेतले जाते. नौशादजींनी संगीतबद्ध केलेली मुघल-ए-आझमची प्यार किया तो डरना क्या ही गाणी आजही गुंजतात. याशिवाय ‘पाकीजा’ चित्रपटाच्या संगीतातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा