Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड जरा इकडे पाहा! नव्या अन् सिद्धांत कारमध्ये दिसले एकत्र; नजर पडताच लाजली बिग बींची नात

जरा इकडे पाहा! नव्या अन् सिद्धांत कारमध्ये दिसले एकत्र; नजर पडताच लाजली बिग बींची नात

मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा चित्रपट निर्माते अमृतपाल सिंग बिंद्रा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्यानंतर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत त्याच कारमधून निघताना दिसली. यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी पुन्हा एकदा पेट घेतला आहे. मात्र, सिद्धांत चतुर्वेदी यांने ऑन कॅमेरा अफेअरच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi ) आणि नव्या नवेली नंदा (navya naveli nanda) यांनी अद्याप त्यांचे नाते सार्वजनिक केले नाही परंतु ते तसे करण्याच्या मार्गावर आहेत असे दिसते. अनेक महिने गुपचूप डेट केल्यानंतर आता दोघे एकत्र दिसत आहेत. काल रात्री म्हणजेच शनिवारी (दि. 10 डिसेंबर)ला दोघेही एकाच गाडीतून पार्टीतून निघताना दिसले. विशेष म्हणजे या पार्टीत सहभागी होण्यासाठी दोघेही वेगवेगळ्या वाहनातून आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

पॅपराजीला पाहून दोघेही हसताना दिसले. या पार्टीत अनेक कलाकार सहभागी झाले होते. यात शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन यांचा समावेश हाेता. तर कॅटरिना कैफ, तृप्ती डिमरी, अनन्या पांडे, शनाया कपूर, सनी कौशल, शर्वरी वाघ, नोरा फतेही आणि करण जोहर यांचाही समावेश हाेता. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीही एकत्र जाताना दिसले.

यापूर्वी, नव्या आणि सिद्धांत यांच्या अफेअरच्या बातम्या तेव्हा उडू लागल्या होत्या, जेव्हा दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या पोस्टवर मजेदार कमेंट करायचे. दोघेही पहिल्यांदा करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसले होते. यानंतर सिद्धांत चतुर्वेदीने नव्या नवेली नंदासोबतच्या अफेअरची बातमी अफवा असल्याचे सांगितले.

सिद्धांत चतुर्वेदी याआधी ‘इंसाइड एज’ नावाच्या वेब सीरिजमध्ये दिसला आहे. त्या व्यतिरिक्त त्याने गली बॉयमध्ये एमसी शेरची भूमिका साकारली होती. त्यात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. तो लवकरच ‘खो गए हम कहां’मध्ये दिसणार आहे. नव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता नंदा यांची मुलगी आहे. ती अलीकडेच तिची आई आणि आजीसोबत पॉडकास्ट होस्ट करताना दिसली.( navya naveli nanda and siddhant chaturvedi amid dating news spotted leaving party together in same car watch viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
थाटामाटात पार पडला गुनीत मोंगाचा संगीत साेहळा, पाहा फोटो
अनुष्काने लग्नाच्या वाढदिवशी विराटला दिल्या ‘हॉरर’ शुभेच्छा! पाहाच व्हायरल फोटो

हे देखील वाचा