Saturday, July 6, 2024

सुंदर! अमिताभ यांची नात नव्या नवेलीने शेअर केला बच्चन कुटुंबातील तीन पिढ्यांचा हृदयस्पर्शी फोटो

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा नवीन पॉडकास्ट, ‘व्हाॅट द हेल, नव्या‘ या कार्यक्रमाल चांगलीच पसंती मिळत आहे. रविवारी (दि. 16 ऑक्टाेबर)ला नव्या नवेली नंदा हिने सुंदर फाेटाे साेशल मीडियावर शेअर केला आहे. या फाेटाेमध्ये आजी, आई आणि मुलगी यांचा त्रिकुट आहे. बच्चन कुटुंबातील तीन पिढ्यांना फोटोमध्ये एकत्र पाहून चाहते आणि फॉलोअर्स खूप आंनदी आहेत. 

फोटोमध्ये नव्या, श्वेता आणि जया बच्चन हसताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रात नव्या आई श्वेता बच्चन नंदासोबत नाही, तर तिची लाडकी आजी म्हणजेच जया बच्चन यांच्यासोबत ट्विनिंग केले आहे. या जबरदस्त फोटोसाठी दोघांनी पांढरा टी-शर्ट  परिधान केला आहे, तर श्वेताने गडद हिरव्या रंगाचा शर्ट आणि डेनिम पॅन्टमध्ये दिसत आहे. या तिघांच्याही फोटोवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

याआधी नव्याच्या शोमध्ये जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी नव्याबद्दल अनेक मजेदार खुलासे केले आणि सांगितले की,  “लहानपणी कशाप्रकारे स्टार किडला सर्व लक्ष स्वतःकडे लागायचे. याशिवाय त्यांनी हेही सांगितले की, एकदा नव्याच्या लिपस्टिकवर जया बच्चन यांना कसा राग आला. त्यांनी ज्याप्रकारे नातिन नव्याची लिपस्टिक पुसली तसाच तिला राग आला आणि ती गाडीतच राडायला लागली.”

दुसरीकडे, जया बच्चन आणि नव्या नवेली नंदा यांनीही खुलासा केला की, “अगस्त्य नंदा तिच्या आजीची चेष्टा करण्यासाठी ‘कभी खुशी कभी गम’ कशा प्रकारे पाहते.” श्वेता म्हणते, “कभी खुशी कभी गम एक असा चित्रपट आहे, जो कधीही जुना होऊ शकत नाही. अगस्त्य हा चित्रपट वारंवार पाहतेय.

नव्या नवेली नंदा हिला बिझनेसवुमन बनायचे आहे. आजकाल ती स्वतःचा पॉडकास्ट कार्यक्रम होस्ट करण्यात व्यस्त आहे. यामध्ये ती आपल्या आजी आणि आईसोबत बसून विविध विषयांवर चर्चा करताना दिसते. सोशल मीडियावरही या कार्यक्रमाबाबत जाेरदार चर्चा सुरु आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
पॅपराझींना बघून जया बच्चन यांचा राग अनावर; चाहते म्हणाले, ‘अशाना बाॅयकाॅट करायला पाहिजे’

तायक्वांदो सामन्यात शाहरुखचा लेक विजेता! अबरामने आनंदात घेतले वडिलांचे चुंबन, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा