बॉलिवूड जग खूपच वेगळे आहे. इथे येणाऱ्या बऱ्याच कलाकारांना आपले स्थान भक्कम करण्यासाठी खूप कसोट्या पार कराव्या लागतात. खास करून अशा कलाकारांना, ज्यांच्याकडे अभिनयाची उत्त्तम कला आहे, परंतु चेहरा बॉलिवूडला साजेसा नाही. अशा कलाकारांना तर फार कसोट्या पार कराव्या लागतात. पण संधी मिळाल्या मिळाल्या, त्यांनी दाखवून दिले की, फक्त अभिनयानेही कलाकार खूप पुढे जाऊ शकतो. बॉलिवूडमध्ये असे काही तारे आहेत, ज्यांना केवळ त्यांच्या अभिनयासाठीच ओळखले जाते, आणि नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui)या यादीमध्ये अव्वल आहे. नवाजुद्दीन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवशी आपण त्याच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी सांगणार आहोत.
View this post on Instagram
आपल्या भूमिकेला पडद्यावर असे सादर करणे की, प्रेक्षकांनी म्हटले पाहिजे, अशी भूमिका कोणीच करू शकत नाही, याकरता बॉलिवूडमध्ये नवजोद्दीन सिद्दीकीचे नाव आघाडीवर घेतले जाते. १९ मे, १९७४ रोजी जन्मलेल्या नवाजुद्दीनने पडद्यावर एक असा योद्धा उभा केला की, जो कोणत्याही हत्यारांशिवाय युद्ध जिंकू शकतो. नवाजुद्दीन सिद्दीकी यूपीच्या मुझफ्फरनगरमधील बुधाना येथील रहिवासी आहे. नवाजचे वडील व्यवसायाने शेतकरी आहेत. संघर्षाच्या दिवसात नवाज जवळच्या खेड्यात राहणाऱ्या अंजलीच्या प्रेमात पडला, आणि लवकरच दोघांचे लग्न झाले होते. असे म्हणतात की, नवाजच्या गावात थिएटर नव्हते. चित्रपट पाहण्यासाठी त्याला ४५ किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी नवाजुद्दीनने फक्त पाच चित्रपटच पाहिले होते. तो दररोज आरशासमोर अभिनयाची तालीमही करायचा.
नवाजुद्दीन पहिल्यांदा पेप्सीच्या ‘सचिन आला रे’ या मोहिमेच्या जाहिरातीमध्ये दिसला होता. ज्यासाठी त्याला ५०० रुपये देण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी नवाजुद्दीनला सुमारे १२ वर्षे संघर्ष करावा लागला होता. १९९९ सालचा बॉलिवूड चित्रपट ‘सरफरोश’मधून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात नवाजचे छोटेसे पात्र असले, तरीही नवाजने त्यात गुन्हेगाराची भूमिका वठवली होती. यानंतर त्याने ‘जंगली’, ‘शुल’ आणि ‘दिल पे मत ले यार’ अशा बर्याच चित्रपटात काम केले आहे. पण या सर्व चित्रपटांमधूनही नवाज याला फारसे ओळखले गेले नाही.
बॉलिवूडमध्ये तब्बल १२ वर्षांच्या संघर्षानंतर, नवाजुद्दीन सिद्दीकीचा अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलला ‘गँग्स ऑफ वासेपुर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात नवाजच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. यानंतर, ‘गँग्स ऑफ वासेपुर २’ मधील नवाजच्या फैझल पात्रानेही सर्वांची मने जिंकली होती. या दोन चित्रपटांनंतर नवाजने पुन्हा कधीही मागे वळून बघितले नाही, आणि पुढे जात जात यशाचे उंच शिखर गाठले आहे.
त्याला अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाद्वारे ओळख मिळाली. ‘न्यूयॉर्क’ चित्रपटातील नवाजुद्दीनच्या अभिनयाने चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांचे मन जिंकले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर कबीर नवाजवर इतके प्रभावित झाले की, त्यांनी ‘बजरंगी भाईजान’साठी नवाजुद्दीनला ही भूमिका ऑफर केली होती.
त्यानंतर त्याने ‘किक’, ‘बदलापूर’, ‘मांझी द माउंटन’, ‘द लंच बॉक्स’, ‘रमण राघव २’, ‘रईस’, ‘मंटो’ आणि ‘ठाकरे’ असे भक्कम चित्रपट केले. नवाजने आपल्या दमदार अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्याने गॅग्स ऑफ वासेपुरच्या आधी ‘शूल’, ‘जंगल’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘द बायपास’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘आजा नचले’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘ब्लॅक अँड व्हाइट’, ‘फिराक’, ‘न्यूयॉर्क’, ‘कहानी’, ‘पतंग’, ‘पानसिंग तोमर’ यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-