सिनेविश्वात कास्टिंग काऊच हा शब्द नवीन नाही. अनेकदा आपण लहान मोठ्या कलाकारांच्या तोंडी हा शब्द ऐकत असतो. काम मिळण्याच्या बदल्यात अनेकदा कलाकारांकडे विविध अनैतिक गोष्टींची मागणी केली जाते. याला अनेक मोठे नावाजलेले कलाकार देखील सामोरे गेले आहेत. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री असलेल्या नयनताराने देखील याबाबत एक मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. लेडी सुपरस्टार असणारी नयनतारा सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. लवकरच ती शाहरुख खानसोबत ‘जवान’ या सिनेमात दिसणार आहे.
नुकताच तिने तिला आलेला कास्टिंग काऊचचा एक अनुभव सर्वांना सांगितला आहे. यामुळे ती चांगलीच गाजत आहे. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, ती देखील या कास्टिंग काऊचचा शिकार झाली आहे. तिने सांगितले की एका सिनेमात मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात एका निर्मात्याने माझ्या समोर काही अटी ठेवल्या होत्या. मात्र मी त्या कोणत्याही अटी पूर्ण केल्या नाही. यामध्ये तिने त्या निर्मात्याच्या नावाचा खुलासा केला नाही. हा अनुभव तिला तिच्या करियरच्या सुरुवातीला आला होता.
पुढे नयनताराने तिच्या नवऱ्याबद्दल चित्रपट निर्माता विग्नेश शिवनबद्दल बोलताना सांगितले की, “त्याच्या प्रेमाने मला शांत केले आहे, आणि आता मी माझ्या जीवनाबद्दल निश्चिंत असून आनंदित आहे. आता मला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. कोणी माझ्यावर टीका करत असेल किंवा कोणत्याही वाईट परिस्थितीत मी असेल आणि माझ्यासोबत माझा नवरा असेल तर मला त्यामुळे सर्व काही ठीक असल्याचे जाणवत असते.” नयनताराच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती शाहरुख खानसोबत ‘जवान’ सिनेमात दिसणार असून. डिसेंबर २०२२ मध्ये तिचा ‘कनेक्ट’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश