Friday, March 29, 2024

Birthday | भोजपुरी सिनेमाचे जनक म्हणून ओळखले जातात अभिनेते नाझीर हुसेन, कारकिर्दीवर एक नजर टाकूया!

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाझीर हुसेन (Nazir Hussain) यांचा जन्म १५ मे १९२२ रोजी झाला. नाझीर हुसेन हे उत्तम अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या पात्रांद्वारे अमिट छाप सोडली होती, परंतु नसीर केवळ एक उत्तम कलाकारच नव्हते, तर एक चांगला लेखक देखील होते हे फार कमी लोकांना माहिती आहे. याशिवाय त्यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ते खरे देशभक्त होते. देशाच्या स्वातंत्र्यातही नाझीर यांचा महत्त्वाचा वाटा होता. इतकेच नाही, तर त्यांना भोजपुरीचे जनक देखील म्हटले जाते. कारण भोजपुरी सिनेमाची सुरुवात नाझीर हुसैन यांनीच केली होती. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

नाझीर हुसैन यांनी ५० ते ७० च्या दशकापर्यंत जवळपास ५०० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत बहुतेक गंभीर भूमिका केल्या. त्यांनी केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच ठसा उमटवला नाही, तर भोजपुरी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीचे श्रेय विशेषतः नाझीर हुसेन यांना जाते, कारण भोजपुरी भाषेतील पहिला चित्रपट त्यांनी बनवला होता. भोजपुरी सिनेमाची सुरुवात नाझीर हुसेन लिखित आणि निर्मित ‘गंगा मैया तोहे प्यारी चढायाबो’ या चित्रपटाने झाली. या चित्रपटानंतर त्यांनी हमर संसार, रस गेल सायं हमर आणि बलम परदेसिया या चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली. अशाप्रकारे त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना भोजपुरी चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाते.

नाझीर हुसैन यांचे वडील साहबजादा रेल्वेत होते, त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नाझीर यांनीही रेल्वेत फायरमन म्हणून काम करण्यास सुरुवात केली, त्या काळात दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ते ब्रिटीश सैन्यात सामील झाले. यानंतर, १९४३ मध्ये, जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज तयार केली, तेव्हा नझीर त्यांच्या सैन्यात NIA च्या रँकमध्ये सामील झाले. युद्धानंतर जेव्हा एनआय सैनिकांना अटक करण्यात आली, तेव्हा नाझीर देखील त्यांच्यात होतेआणि अशा प्रकारे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

साल १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्व सैनिकांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले, मात्र सैन्यात नोकरी नाकारण्यात आल्यानंतर नाझीर आणि त्यांचे साथीदार कलेकडे वळले. या दोघांनी मिळून देशभर नाटके रंगवायला सुरुवात केली. येथूनच त्यांची सिनेक्षेत्रातील नवी इनिंग सुरू झाली. नाजीर फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यासाठी कलकत्त्यात आले आणि त्यांनी बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम केले. १९५० मध्ये त्यांनी आझाद हिंद फौजेवर आधारित ‘पहेला आदमी’ चित्रपटाचे संवाद लिहिले. बिमलरॉय दिग्दर्शित या चित्रपटात नझीरनेही डॉक्टरची भूमिका साकारली होती आणि तेव्हापासून तो कॅमेऱ्यासमोर भूमिका साकारू लागला. नझीर हुसैन यांच्या जीवनाकडे पाहिले तर ते प्रेरणास्थान होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा