Thursday, April 18, 2024

आतापर्यँत ‘या’ दाक्षिणात्य कलाकारांनी बॉलिवूडचा परखड शब्दात घेतलाय समाचार

सध्या चित्रपट जगतात दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये चांगलेच युद्ध सुरू असलेले पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य सिने जगताला मिळणारे यश आणि हिंदी भाषेवरुन हा सगळा वाद सुरू झाला होता. या वादात आत्तापर्यंत अनेक टॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. मात्र टॉलिवूड कलाकारांनी बॉलिवूड चित्रपटांबद्दल आणि सिने जगताबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनी बॉलिवूडबद्दल भाष्य केले आहे. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ. 

महेश बाबू

बॉलीवूड आणि साऊथ सिनेसृष्टीमध्ये सुरू असलेल्या वादात महेश बाबूच्या वक्तव्याने आणखीच भर पडली आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण न केल्याबद्दल या अभिनेत्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते आणि ‘मेजर’ चित्रपटाच्या ट्रेलर इव्हेंटमध्येही असेच घडले. मात्र यावेळी महेश बाबूने हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यास स्पष्ट नकार देत बॉलीवूडच्या लोकांना ते परवडणारे नसल्याचे सांगितले होते. ज्यामुळे अनेक कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या.

प्रियामणी

अभिनेत्री  प्रियामणी चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील ‘लेट्स ऑन द डान्स फ्लोर’ गाण्यात आणि ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये दक्षिण भारतीयांच्या प्रतिमेबद्दल एकदा तीने “आता साऊथचे स्टार लोकांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. तिथल्या प्रतिभेला पसंती दिली जात आहे. असे वक्तव्य तिने केले होते. याबद्दल बोलताना प्रियामणीने ” एक काळ असा होता की श्रीदेवी, रेखा, हेमा मालिनी आणि वैजयंतीमाला बॉलिवूडवर राज्य करत होते. मात्र त्यांच्यानंतर दक्षिणेतील कोणताही अभिनेता त्यांच्यासारखा दिसला नाही. बॉलीवूडमध्ये आपण फक्त हिंदी भाषिक लोक पाहिले आहेत. हे लोक साऊथ इंडियन स्टार्सना अशा पद्धतीने दाखवायचे की त्यांना हिंदी नीट कसे बोलावे ते कळत नाही. आमच्या भाषेची खिल्ली उडवत ते अय्यो, हाऊस जी, काय बोलते जी म्हणायचे” अशी प्रतिक्रिया दिली होती.

श्रुती हसन

अभिनेत्री  श्रुती हसन अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे परंतु तिने तिच्या एका विधानात सांगितले होते की “मी स्वतःला नेहमीच बॉलीवूडमध्ये बाहेरची व्यक्ती समजत आली आहे. येथे नेहमी उत्तर आणि दक्षिण गोष्टी असतात. समजा मी तीन तेलुगु आणि तामिळ चित्रपट एकत्र करत आहे, तर तिथले लोक म्हणतात की तुम्ही हिंदीकडे लक्ष देत नाही. जसे की देशात एकच उद्योग आहे.”

यश –

‘KGF’च्या यशानंतर यश इंडियाचा स्टार बनला आहे. एकदा सलमान खानने विचारले होते की, “साऊथचे चित्रपट बॉलिवूडमध्ये चांगले प्रदर्शन कसे करतात?” यशने यावर प्रतिक्रिया दिली होती आणि सांगितले होते की, “त्याच्या चित्रपटांना इथे चांगला प्रतिसाद मिळाला नाही पण साऊथचा रिमेक बॉलीवूडमध्ये करण्यात आला, त्यामुळे लोकांना तिथल्या सिनेमाची माहिती झाली. आता लोकांना साऊथ सिनेमाबद्दल माहिती व्हायला लागली आहे. हे सर्व काही एका रात्रीत घडलेले नाही. त्याला बरीच वर्षे लागली.”

अल्लू अर्जुन –

‘पुष्पा: द राइज’ नंतर अल्लू अर्जुन देखील स्टार बनला आहे आणि त्याला बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या आहेत. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “इतर कोणत्याही इंडस्ट्रीत काम करण्यासाठी धैर्य आणि जोखीम घ्यावी लागते. जेव्हा आपण आपल्या चित्रपटात नायकाची भूमिका करतो तेव्हा कोणीतरी त्याच भूमिकेसाठी आपल्याकडे येतो. मला इतर कोणत्याही भूमिकेत रस नाही. दुसरा माणूस चित्रपटासाठी तुमच्याकडेही येणार नाही कारण एखाद्या मोठ्या स्टारने चित्रपटात दुसरी भूमिका घेणे अर्थपूर्ण नाही. तुम्हाला फक्त मेन लीड म्हणून काम करायचे आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा