कडक कारवाई.! ड्रग्ज प्रकरणी ‘या’ टॉलीवूड अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक; ड्रग्जही केले जप्त

कडक कारवाई.! ड्रग्ज प्रकरणी 'या' टॉलीवूड अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक; ड्रग्जही केले जप्त


सध्या बॉलिवूडमध्ये NCB नावाचे वादळ फिरत आहे. काहीच महिन्यांपूर्वी बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन समोर आले होते. त्यानंतर अनेक लहान मोठ्या कलाकारांना NCB कडून समन्स बजावून चौकशीला बोलावले गेले तर काहींना अटक करण्यात आली. एकात एक अशा गुंतलेल्या या केसमध्ये NCB चे सतत धाड सत्र सुरु आहे.

नुकतेच एनसीबीने महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्याचवेळी दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेता कुमारी हिला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. श्वेताला मुंबईजवळील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, एनसीबीने मुंबईच्या क्राउन बिझनेस हॉटेलवर छापा मारत ४०० ग्रॅम एमडी जप्त केले आहे. अभिनेत्री श्वेता कुमारी ही हैदराबाद येथील रहिवासी आहे. ती सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, श्वेताची सोमवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांनी तिला अटक केली आहे. श्वेताकडून आम्हाला सापडलेल्या ४०० ग्रॅम एमडीची समाधानकारक माहिती मिळाली नाहीये. या छापेमारीत ड्रग पैडलर चांद मोहम्मदला अटक केले असून ड्रग सप्लायर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

श्वेताच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर श्वेताने अतिशय कमी चित्रपटात काम केले आहे. तिने जास्तकरून सहायक भूमिकाच केला आहेत. श्वेताच्या चौकशीतून यात अडकलेल्या अनेक नावांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.