Wednesday, July 3, 2024

‘आर्यन खान अं’मली पदार्थांचे सेवन करतो, हे माहितीये का?’, अनन्याला चौकशीदरम्यान एनसीबीने विचारले १२ प्रश्न

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणामुळे मागील काही दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याला या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ३ ऑक्टोबरला एका अं’मली पदार्थांच्या पार्टीत सामील झाल्याने अटक करण्यात आली होती. एनसीबीने एका छाप्यादरम्यान त्याला या पार्टीतून ताब्यात घेतेल होते. त्यानंतरपासून आतापर्यंत आर्यनच्या जामीनावर निर्णय घेण्यात आलेला नाही. अशातच आता या प्रकरणात बॉलिवूडमधील इतर कलाकारही अडकताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव समोर आले आहे. अनन्याच्या घरी एनसीबीने छापा टाकला आहे. एनसीबीने अभिनेत्रीला समन्स पाठवले होते. त्यानंतर ती हजर झाली आणि तिची चौकशी करण्यात आली.

तीन अधिकाऱ्यांनी केली चौकशी
सूत्रांच्या माहितीनुसार, अनन्याच्या चौकशीदरम्यान एक महिला अधिकारी आणि दोन पुरुष अधिकारी उपस्थित होते. यामध्ये समीर वानखेडे यांचाही समावेश होता. अनन्याचे वकील किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला चौकशीदरम्यान उपस्थित उपस्थित राहू दिले नव्हते. त्यामुळे तिच्यासोबत एनसीबी ऑफिसला पोहोचलेले तिचे वडील चंकी पांडे यांनाही बाहेरच वाट पाहावी लागली होती. यादरम्यान अनन्याची जवळपास २ तास चौकशी करण्यात आली. तिला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आता अनन्याची शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) पुन्हा चौकशी होईल.

अनन्याला विचारण्यात आले हे प्रश्न

सूत्रांच्या माहितीनुसार, अनन्या पांडेला एनसीबीकडून हे १२ प्रश्न विचारण्यात आले…

१. तुमचे नाव, वय, पत्ता, व्यवसाय काय आहे?
२. तुम्ही आर्यन खानला ओळखता का?
३. जर हो, तर तुम्ही आर्यनला केव्हा आणि कशाप्रकारे ओळखता?
४. तुमची आर्यनशी शेवटची चर्चा केव्हा आणि का झाली?
५. चरस वगैरे अं’मली पदार्थांशी संबंधित गोष्टी आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?
६. आर्यन खान अं’मली पदार्थांचे सेवन करतो किंवा कधी त्याने त्याचे सेवन केल्याचे तुम्हाला माहिती आहे का?
७. तुमच्यात आणि आर्यनमध्ये कधी अं’मली पदार्थाबाबत चर्चा झाली का?
८. तुम्ही कधी अं’मली पदार्थांचे सेवन केले किंवा खरेदी केले आहे का?
९. तुम्ही कधी आर्यनला अं’मली पदार्थांचे सेवन करताना किंवा खरेदी करताना पाहिले आहे का?
१०. याव्यतिरिक्त तुम्ही बॉलिवूड पार्टीत इतर कोणाला अं’मली पदार्थांचे सेवन करताना पाहिले आहे का?
११. तुम्ही अशा व्यक्तीला ओळखता का, जो अं’मली पदार्थ पुरवतो?
१२. आर्यनसोबत झालेल्या या चॅटसंदर्भात तुम्हाला काय म्हणायचंय?

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

हे देखील वाचा