Saturday, July 27, 2024

जितेंद्र आव्हाडांनी केलं आशोक सराफांचं अभिनंदन,म्हणाले,’सरकारने कोणतीही “बनवाबनवी”… ‘

सध्याला महाराष्ट्रात आनंदाची लाट वाहत आहे. याला अगदी कोणीच अपवाद नाही आणि हा आनंदाचं कारण म्हणजे, मराठी सिनेसृष्टीत आणि मनोरंजन विश्वात दिलेल्या योगदानामुळे आशोक सराफांना महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ही बातमी समोर आल्यापासुन महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी ठरलेले आशोक सराफ(Ashok Saraf) चर्चेत आहेत. त्यांच्यावर सर्वच स्थरांवर शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव होत आहे. बड्या नेत्यांपासुन ते सामान्य माणसांपर्यंत सर्वत्र त्यांचा चाहता वर्ग आणि शुभचिंतक पसरलेले आहेत. अशाच आनंदमय वातावरणात अनेक राजकारण्यांनीही आशोक सराफांना शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु एका नेत्याने या शुभेच्छा जरा हटके पद्धतीने दिल्या आहेत. ते नेते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhadh).

जितेंद्र आव्हाडांनी केलं आशोक सराफांचं अभिनंदन
महाराष्ट्र भुषण पुरस्कार(Maharashtra Bhushan Award) जाहिर झाल्यावर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या ऑफिशिअल ‘एक्स’ हँडलवर एक पोस्ट टाकत आशोक सराफांचे अभिनंदन केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आशोक सराफांचा एक कँडिड फोटो टाकत त्यावर कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले,”ज्येष्ठ अभिनेते श्री.अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय.ही आनंदाची बातमी आहे.”
पुढे सत्तेत असणाऱ्या पक्षाला चिमटा काढत ते म्हणाले, “आमचं तारुण्य आणि त्याच्या आठवणी चिरतरुण ठेवणाऱ्या या “अफलातून” नायकास हा पुरस्कार देताना या सरकारने कोणतीही “बनवाबनवी” केली नाही,याचा आनंदच आहे.आता मोठ्या “धूमधडाक्यात” त्यांना हा पुरस्कार प्रदान व्हावा,या सदिच्छा..! ”

जितेंद्र आव्हाडांच्या या पोस्टवर आशोक सराफांनी अजुन प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु त्यांच्या अनेक चाहत्यांनी आणि जितेंद्र आव्हाडांच्या फाॅलोवर्सनी या पोस्टखाली कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहिर झाल्यावर आशोक सराफ सरांनी आज त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.मला आनंदंच आहे परंतु इतक्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं असं यावेळी ते म्हणाले.

पुरस्कार जाहिर झाल्यापासुन येणाऱ्या शुभेच्छांसाठी आशोक सराफांनी त्यांच्या चाहत्यांचे आणि शुभचिंतकांचे आभार मानले त्यासोबतंच त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देखील माध्यमांसोबत शेअर केली .यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचीही प्रतिक्रिया माध्यमांशी शेअर केली आहे. निवेदिता मॅडमची प्रतिक्रिया सांगताना ते म्हणाले,”याबाबत निवेदिता(Nivedita saraf) यांनाच पहिला फोन आला होता. ती आनंदाने किंचाळली.” असं सांगत त्यांनी त्यांच्या पत्नीचेही आभार मानले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Ashok Saraf | ‘कोणी गुरू नसला, तरीही अनेकांकडून मी शिकत गेलो’, ‘पिफ’मध्ये रंगली अशोक सराफ यांच्या गप्पांची मैफल
Ashok Saraf |’अशोक सराफ यांची चालू प्रयोगात घसरली पॅन्ट अन्…’, वाचा नेमक काय आहे ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा