Monday, September 25, 2023

‘अशोक सराफ यांची चालू प्रयोगात घसरली पॅन्ट अन्…’, वाचा नेमक काय आहे ‘तो’ किस्सा

मराठी मनोरंजनविश्वातील खरे कोहिनुर म्हणून जे नावं घेतले जाते ते म्हणजे अशोक सराफ यांच होय. अशोक सराफ यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी सिने सृष्टीत नाव कमवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. अनेकदा काम करताना अशोक सराफ यांना छोटे मोठे अनुभव आले आहेत. असाच एक किस्सा अशोक सराफ यांनी सांगितला आहे. काम करताना अशोक सराफ यांची मोठी गोची झाली होती.

अशोक सराफ  (Ashok Saraf) यांनी एका पेक्षा एक सुंदर नाटकांमध्ये काम केले आहे. पण एका नाटकाच्या सेटवर अशोक सकाफ यांची चांगलीत फजिती झाली होती. अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहूरुपी’ या पुस्तकात या फजितीचा किस्सा सांगितला आहे. ‘बोल राधा बोल’ या नाटकात अशोक सराफ काम करताना दिसले.

‘बोल राधा बोल’ या नाटकात काम करताना अशोक सराफ यांनी दोन भूमिका पार पाडल्या आहेत. त्यातील तिसऱ्या अंकात एकाची एक्झिट झाली की त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर दुसऱ्याची एन्ट्री होणार असते. त्यावेळी दुसरा होता मवाली. त्या मवालीची एन्ट्री हातात सुरा घेऊन होते. त्यावेळीचा किस्सा अशोक सराफ यांनी सांगितला आहे.

अशोक सराफ म्हणाले की, “विंगेत जीन्स मला खूप कमी वेळात बदलायची होती. कारण खूप घाई मागे होती. त्यामुळे मी खुप कमी वेळात तयार झालो. तेव्हा मी चाकू घेऊन स्टेजवर एन्ट्री केली. मी स्टेजवर आलो आणि प्रेक्षकांमधून कुजबूज ऐकू आली. त्यावेळी माझी भूमिका विनोदी नव्हती. पण अस का झाल हेच मला समजत नव्हत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “तेव्हा माझ्या समोर स्टेजवर नैना आपटे होत्या. मी त्यांच्याकडे पाहिलं. पण त्या फक्त माझ्याकडे बघत होत्या. त्यांना मला काहीच सांगता येत नव्हत. त्यामुळे मला संशय आला. मग मी खाली वाकून बघितल. तेव्हा माझ्या जीन्सची जीप उघडी दिसली. तेव्हा मी खूप घाबरलो होतो. त्यावेळी कशीबशी जीप वर घेतली. आणि डायलॉग म्हणायला सुरुवात केली.यावेळी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या” असे सांगितले. (Famous Marathi actor Ashok Sarafa told the story of Fijiti)

अधिक वाचा- 
कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ अन् जटाधारी अवतारात दिसला अक्षय, युजर्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
श्वेता तिवारीच्या काळ्या साडीतील घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून चाहते फिदा

हे देखील वाचा