Saturday, June 29, 2024

ऋषी कपूर यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडियो नीतू कपूर यांनी केला शेअर; म्हणाल्या…

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांना स्वर्गवासी होऊन जवळपास 9 महिने उलटून गेले आहेत. पण त्यांची पत्नी नीतू कपूर त्यांची नेहमीच आठवण काढत असतात. सोशल मीडियावरून नीतू या ऋषी कपूर यांच्यासोबतच्या अनेक आठवणी शेअर करत असतात. नुकतेच नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा त्यांचा पहिला डान्सचा व्हिडियो शेअर केला आहे.

नीतू कपूर या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. यासोबतच त्या आपले पती ऋषी कपूर यांच्यासोबतचे कधीही न पाहिलेले अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असतात.

नीतू यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडियोमध्ये नीतू कपूर आणि ऋषी कपूर हे एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत. हे दोघे 1975 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘जिंदा दिल’ यातील ‘शाम सुहानी’ या गाण्यावर डान्स करत होते. या व्हिडियोसोबत नीतू यांनी कॅप्शन टाकलं आहे की, “आमचा पहिला डान्स.”

नीतू कपूर यांचा हा व्हिडियो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडियोला खूप लाईक्स देखील मिळत आहे. या व्हिडियोवर नीतू आणि ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा कपूर हिने देखील कमेंट केली आहे. तसेच सर्व चाहते ऋषी कपूर यांचा व्हिडियो पाहून पुन्हा एकदा त्यांचा आठवणीत रमून गेले आहेत.

नुकतेच नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाला 41 वर्षे पूर्ण झाली, तेव्हाही नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडियोमध्ये ऋषी कपूर यांच्या अनेक चित्रपटातील सीन आहेत. ज्यात नीतू आणि ऋषी यांनी एकत्र काम केलं होतं. तसेच काही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंग देखील होते, जे चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आणि प्रेम सिद्ध करण्यासाठी ऋषी कपूर यांनी दिलेली अंगठी डिंपल कपाडियांनी फेकली होती समुद्रात

वयाच्या चौदाव्या वर्षीच नीतू सिंग करायची ऋषी कपूरबरोबर डेट, लग्नात दोघेही झाले होते बेशुद्ध

बॉबी नव्हे तर ‘हा’ होता ऋषी कपूर यांचा पहिला सिनेमा! आज असते तर करियरची पन्नाशी पूर्ण झाली असती…

हे देखील वाचा