Saturday, July 27, 2024

बॉबी नव्हे तर ‘हा’ होता ऋषी कपूर यांचा पहिला सिनेमा! आज असते तर करियरची पन्नाशी पूर्ण झाली असती…

ऋषी कपूर हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू अभिनेते होते. त्यांनी नायक, खलनायक, सहाय्यक अभिनेता, विनोदी भूमिका आशा सर्व प्रकारचा अभिनय केला. आणि गेली पन्नास वर्षे आपलं भरपूर मनोरंजन केलं. ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीला देखील आज जीवित असते तर ५० वर्षे पूर्ण झाली असती.

बर्‍याच लोकांचा गैरसमज आहे की ऋषी कपूर यांनी आपल्या करिअरची सुरूवात ‘बॉबी’ चित्रपटापासून केली होती. पण खरं तर तसं नाही आहे. सर्वात आधी त्यांनी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्यांचे वडील राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

Rishi Kapoor in Mera Naam Joker

आज जर ऋषी कपूर आपल्यात असते तर कपूर घराण्यात खूप मोठा उत्सव साजरा झाला असता. कारण मेरा नाम जोकर या महान सिनेमासोबतच ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीला देखील ५० वर्षे पूर्ण झाली असती. आजच्या या घडीला ना राज कपूर आपल्यात आहेत ना ऋषी कपूर.… या पिता पुत्राच्या जोडीने भारतीय सिनेमाची मनोभावे सेवा केली होती.

ऋषी कपूर यांच्या पत्नी नितु कपूर यांनी या खास क्षणांना ऋषीजींच्या चार विभिन्न वयातील चार वेगळ्या भूमिकांच्या फोटोचं कोलाज सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या निमित्ताने आपल्याला ऋषी यांच्या काही महत्त्वाच्या सिनेमाचं समरण करावंच लागेल. अर्थात याची सुरुवात मेरा नाम जोकर पासूनच होईल.

यानंतर, ‘बॉबी’, ‘ओम शांती ओम’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘कुली’, ‘चांदनी’, ‘मुल्क’, ‘अग्निपथ’ (२०१३), ‘हाऊसफुल २’ ही काही गाजलेल्या सिनेमांची यादी आहे. असे अनेक हिट सिनेमे ऋषी यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये दिले आहेत. दैवदुर्विलास असा की यापुढे त्यांच्या नव्या कलाकृती आपल्याला कधीच पाहता येणार नाहीत मात्र तरीही ते कायम आपल्या चिरकाल समरणात राहतील.

यावर्षी ३० एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन झालं. २०१९ मध्ये त्यांना कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते आणि नीतू कपूर जवळपास १ वर्ष न्यूयॉर्कमध्ये राहिले आणि तिथेच उपचार घेऊन पुन्हा भारतात परतले. त्यांनी पुन्हा शूटिंगलाही सुरुवात केली होती पण एप्रिलमध्ये त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा